agriculture news in marathi, drought condition worsen in Marathwada region | Agrowon

निकस चारा खाणारी जनावरं; सरपण झालेल्या बागा
संतोष मुंढे
शुक्रवार, 15 मार्च 2019

औरंगाबाद : सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍या जनावरांची आबाळ पाहावेना म्हणत भविष्याविषयी चिंताक्रांत झालेले प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे चेहरे बरंच काही सांगून जातात...

औरंगाबाद : सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍या जनावरांची आबाळ पाहावेना म्हणत भविष्याविषयी चिंताक्रांत झालेले प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे चेहरे बरंच काही सांगून जातात...

औरंगाबाद जिल्ह्यातील मंगरूळ घोडक्‍याची वाडी, एकलहरा, कौडगाव, अडगाव (ठोंबरे), जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या वाकुळणी, बाजार वाहेगाव, नाणेगाव, सायगाव, डोंगरगाव, बुट्टेगाव, काजळा, अंबड तालुक्‍यातील बदापूर, लोणार भायगाव, खेडगाव, देशगव्हाण, भायगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील एकतुणी, आडूळ आदी गावशिवारं सुन्न झाली आहेत. 

प्रत्यक्ष पहा दुष्काळाची तीव्रता... पहा Video

मंगरूळचा नामदेव चिंचोले हा युवा शेतकरी. पाच एक मालकीची अन्‌ जवळपास दहा एकर बटईची शेती वाहणाऱ्या नामदेवांकडं जवळपास १२ जनावरं. त्यात ८ गाई व चार बैल. नामदेव म्हणाले, ‘‘दसऱ्यापासून चारा अन्‌ पाणी इकतचं हाय. १ टन ऊस, १ टन भुसा अन्‌ घरचं थोडं बहुत सरमाडं टाकून कसेबसे पंधरा दिवसं भागतात. जेमीनीत ओलंच नसल्यानं रब्बीची पेरणीच करता आली नाय. पीक नसल्यानं यंदा खता बियांचे पैसे फिटले नाय. आजवरं चाऱ्यापोटी ५० हजार खर्च झाला. इकून तिकून आणून भागवनं चाललं. महिना-पंधरवड्यानं गावड्या व्यातील तवां थोडा हातभार लागलं अशी आशा हायं. २०० उंबऱ्याच्या आमच्या गावातील ५०-६० मुलांनी हाताला काम मिळावं म्हणून एमआयडीसी गाठलीया. जनावरं इकता येत नाहीत. त्यामुळं त्यांना खाऊ घालून सकाळ संध्याकाळ जमलं तसं काम करणं सुरू हायं.’’  

खायला दाणे झाले नाही... जित्राबाचं जगणं अवघडं झालयं
घोडकेवाडीचे शिवाजी घोडके म्हणाले, ‘‘दरवर्षी निदान खायला दाणे व्हायचे यंदा ते बी झाले नायं. अन्‌ पाण्याचं त भलतचं अवघड होऊन बसलं. यंदाच्या दुष्काळचं पहिलं संकट ओढावलं ते जित्राबावर. त्यांना ना खायला चारा मिळे ना प्यायला पाणी. लेकरापेक्षा जास्त जनावरावरं प्रेम करणारे आमी. त्यामुळे कुणी वाळेल चिळेल आणलं, कुणी सोनं नाणं गहाण ठेवून मिळलं तिथून चारा, भूस आणलं. आमच्या ईहिरीला थोडबहूत पाणी. संकट पाहून आमी  चारां पिकं घेण्याऐवजी ते जित्राबांना प्यायला ठेवलं. कारणं आपणं खायला लागणारं इकत आणू शकतो, पणं पाणी कुठून आणि किती इकत आणणार. आता आमच्या शेतात मंगरूळ, एकलहरा, नागोण्याची वाडी अन्‌ आमच्या गावातील जित्राब पाणी प्यायला येतात.’’

अडगाव (खुर्द)चे सुनील कुलकर्णी म्हणाले, ‘‘एक टन भूस आणायला दहा हजार खर्ची घातले. खरीप रब्बीत काहीच हाती न आल्यानं कुटुंबाचा चरितार्थ अन्‌ आठ जनावरं जगविण्यासाठी दोन भावांनी एमआयडीसीत कामाला जाणं सुरू केलं. माणसाला खायला राशनमधून मिळल पण जनावराचं काय. शिवाय माणसांना टॅंकरनं पाणी मिळतयं. पणं जनावरांना टॅंकरनं पाणी इकत घेऊन पाजण्याशिवाय पर्याय नाही. पण ते कुठवर शक्‍य. कारण काहीच न पिकल्यानं अनेकांकडे पैसेच नाहीत’’

अडगावचे भाऊसाहेब बोर्डे म्हणाले, ‘‘वर्षभरापूर्वी गीर गाय आणली. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावं म्हणलं. पणं आता जनावरांच्या चाऱ्याचं भीषणं संकट उभं राहिलयं. उन्हाची तीव्रता वाढली, कधी नव्हे एवढी सीताफळाची झाडं सुकली. ठीबकनं पाणी देतोयं, पण उन्हाची वाढलेली तीव्रता, घटत चाललेलं पाणी पाहतां झाडांच्या सालीतील पाणीच सुकून गेलं तर सीताफळाची बाग वाचल का हा प्रश्न आहे.’’

भीकनराव अवघड पाटील म्हणाले, ‘‘अकरा एकरांत ४० क्‍विंटल सरकी झाली. भाव नव्हतां म्हणून दाबून धरली. तं कपाशीचे भावच सुधरेना, काय करावं.’’ 

वाकुळणीच्या अवघड पाटलांना तर शेतीची वाटच अवघड झाल्याचा अनुभव आहे. गावातील कैलास कोळेकर यांना पंधरवड्यापूर्वी पाण्याअभावी शेकडो मोसंबीची वाळलेली झाडं तोडून टाकावी लागली. अर्जुन कोळकर यांना वाचललेल्या मोसंबीच्या दोनशे झाडांतून यंदा १ लाख ३ हजार मिळाले. तर त्यावर फक्‍त पाण्यासाठी जुलैपासून ८० हजार खर्च झाला. पाच किलोमीटरवरून पैसे ॲडजेस्ट होतील तोवर आणून. पैशाची व्यवस्था झाली नाही तर बाग सोडून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे अर्जुन कोळकर यांनी सांगितले.

तुकाराम अवघड, शिवाजी अवघड, संदीपान मदन, राधाकिसन भाबड, ज्ञानेश्वर फलके, कैलास कोळकर आदी दुष्काळाची व्यथा मांडताना कमालीचे चिंताक्रांत दिसले. कोणतंही व्यसन नाही. कोणता शोक नाही, शेतीतलं पिकलेलं शेतीतच घातलं तरी एका शेतकऱ्याला साडेचार एकर जमीन इकावी लागली. त्यामुळं शेतीतून आपलं भल व्हईल असं दिसत नसल्याची सामूहिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे व्यवस्था पाहणाऱ्या मायबाप सरकारचं अन्‌ यंत्रणेच लक्ष वेधणारी आहे.

इतर बातम्या
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...