agriculture news in marathi, drought Declared in 544 villages of Bhandara district | Agrowon

भंडारा जिल्ह्यातील ५४४ गावांमध्ये दुष्काळ घोषित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

भंडारा : नजरअंदाज व सुधारित पैसेवारीच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा खरिपाच्या अंतिम पैसेवारीकडे होत्या. मात्र जिल्ह्याची अंतिम खरीप पैसेवारी ४८ जारी करण्यात आली. यात भंडारा व पवनी वगळता पाच तालुक्‍यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली असल्याने या पाच तालुक्‍यांना दुष्काळी निकषानुसार मदत मिळणार असली, तरी भंडारा व पवनी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मात्र यापासून वंचित राहावे लागणार आहे.

भंडारा : नजरअंदाज व सुधारित पैसेवारीच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा खरिपाच्या अंतिम पैसेवारीकडे होत्या. मात्र जिल्ह्याची अंतिम खरीप पैसेवारी ४८ जारी करण्यात आली. यात भंडारा व पवनी वगळता पाच तालुक्‍यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली असल्याने या पाच तालुक्‍यांना दुष्काळी निकषानुसार मदत मिळणार असली, तरी भंडारा व पवनी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मात्र यापासून वंचित राहावे लागणार आहे.

धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात या वर्षी धानावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यासोबतच पाऊसमान कमी झाल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. जिल्हा प्रशासनाने एक महिन्यांपूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली.

खरीप हंगामाच्या सुरवातीपासून दुष्काळसदृय परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीक क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाऱ्याने केलेले नुकसान याचा समावेश करीत सुधारित आणेवारी जाहीर होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

परंतु जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. सुधारित आणेवारीच्या घोषणेनंतर ३१ डिसेंबरला खरीप पिकांची अंतिम आणेवारी घोषित करण्यात आली. जिल्ह्यात खरिपाची ८८४ गावे व रब्बी पिकांची १४ गावे, असे एकूण ८९८ गावे आहेत. त्यापैकी ८४३ खरीप गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. १४ रब्बी गावांची पैसेवारी रब्बी हंगामात स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

८४३ पैकी ५४४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, तर २९९ गावांची ५० पैशांच्यावर आहे. यात भंडारा तालुक्‍यात एक तर पवनी तालुक्‍यात सात गावांची पैसेवारी कमी असलेल्यांमध्ये समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...