agriculture news in marathi, Drought hit 5 lakh hectares in Solapur | Agrowon

सोलापुरात पाच लाख हेक्‍टरला दुष्काळाचा फटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

खरीप हंगामातील दुष्काळ सूचित केलेल्या तालुक्‍यांची माहिती शासनाला सादर केली आहे. त्यामध्ये दिलेले क्षेत्र व बाधित शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये थोडीफार तफावत असू शकते. उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनाही दुष्काळी मदतनिधी मिळावा, अशी विनंती शासनाला केली आहे.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाअभावी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहेच, पण रब्बीही आता जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर दुष्काळाने बाधित क्षेत्राचा सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला आहे. त्यात जवळपास अकरा तालुक्‍यातील ४ लाख ९३ हजार १४८ हेक्‍टर क्षेत्राला फटका बसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख ७७ हजार ७४७ शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या क्षेत्रावरील शेतपिकांचे सुमारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले आहे.

राज्य शासनाच्या ट्रिगर दोनच्या तपासणीनुसार जिल्ह्यातील अकरापैकी केवळ नऊ तालुक्‍यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. पण उत्तर सोलापूर व बार्शी हे दोन तालुके वगळले आहेत. जिल्हा प्रशासनाने आता या दोन्ही तालुक्‍यांतील पीक परिस्थितीची माहितीही या अहवालात पाठवून दुष्काळ यादीत या तालुक्‍यांचा समावेश करावा, अशी विनंती केली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील ३३ ते ५० टक्के नुकसान झालेले क्षेत्र किती, शेतकरी किती, ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र किती, शेतकरी किती, बारमाही पिकांचे क्षेत्र व शेतकरी किती ही सगळी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या नऊ तालुक्‍यांत ३३ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ४२ हजार ७६३ इतकी आहे. या शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र एक लाख २७ हजार ३३९ हेक्‍टर इतके आहे. तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची आकडेवारी दोन लाख ८६ हजार ६६९ हेक्‍टर इतकी आहे. या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख १६ हजार ६९६ हेक्‍टर आहे. उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍यांतील ७९ हजार १४० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १८ हजार २८८ इतकी आहे. मुख्यतः या सर्व क्षेत्रांवर मूग, मटकी, सोयाबीन, तूर आदी पिकांचा समावेश आहे.

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...