agriculture news in marathi, Drought-hit farmers need help | Agrowon

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर टॅँकर मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर तहसीलदारांना असतात, परंतु अजूनही टॅँकर मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवले जातात. त्यामुळे १० ते १२ दिवसांचा अवधी निघून जातो. तसेच शासन मानसी २० लिटरप्रमाणे पाणी देते. ते कमी पडत असल्याने शासनाने दर व्यक्ती ४५ लिटरप्रमाणे पाणी द्यावे. दुष्काळी तालुक्यात चारा डेपो, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे आदींसह शासकीय उपाययोजना तत्काळ सुरू करण्यात याव्यात.
                                                                 - अरुण वाघ, माजी सभापती, कृ. उ. बा. सिन्नर

सिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. परतीचा पाऊसही वेळेवर न झाल्यामुळे सिन्नर तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना शासनाने जाहीर केल्या. मात्र, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबत शेतकऱ्यांना आस लागली आहे.

शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तरीही उपाययोजनेला मात्र अजूनही सुरवात नाही. शासनाकडून तालुक्यातील पिकांच्या नुकसानाचे सत्यमापन चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर गतमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाईनिवारणासाठी सरकारमार्फत जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजदेयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा, नळपाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना लागू करण्याची घोषणा शासनाने केली आहे. या वर्षी सिन्नर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिके घेता आली नाहीत. असलेली पिके पाण्याअभावी करपून गेली. खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्याने बळिराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

चाऱ्याचा प्रश्न गंभीर
तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना हिरवा चारा न झाल्याने दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत आहेत. चाराही संपुष्टात आला आल्याने पशुधन धोक्यात आले आहे. चारा छावणी सुरू करण्याची मागणीही शेतकरी करत आहे.

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
या वर्षी तालुक्यात पाणीटंचाईचे संकट मोठे आहे. सध्या ११ गावे व १२४ वाड्या, वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे, अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे  आहेत. दिवसेंदिवस नवीन गावांचेही व वाड्या, वस्त्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त होत आहेत.

इतर बातम्या
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...