agriculture news in marathi, Drought Relief in five Talukas of Akola | Agrowon

अकोल्यातील पाच तालुक्यांत दुष्काळी सवलत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

अकोला : जिल्ह्यात या खरीप हंगामात कमी उत्पादन अालेल्या गावांमध्ये ट्रीगर २ लागू झाला अाहे. अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यात दुष्काळी सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली.

जिल्ह्यात या मोसमात सरासरी इतका पाऊस झाला. मात्र दोन पावसांतील खंडामुळे खरीप हंगाम अडचणीत सापडला होता. एेन गरजेच्या काळात पाऊस न झाल्याने उत्पादकतेला फटका बसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. नवीन निकषांनुसार जिल्ह्यात ट्रीगर २ लागू झाला अाहे. यामुळे पाच तालुक्यांत दुष्काळी सवलती लागू करण्यात अाल्या.

अकोला : जिल्ह्यात या खरीप हंगामात कमी उत्पादन अालेल्या गावांमध्ये ट्रीगर २ लागू झाला अाहे. अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यात दुष्काळी सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली.

जिल्ह्यात या मोसमात सरासरी इतका पाऊस झाला. मात्र दोन पावसांतील खंडामुळे खरीप हंगाम अडचणीत सापडला होता. एेन गरजेच्या काळात पाऊस न झाल्याने उत्पादकतेला फटका बसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. नवीन निकषांनुसार जिल्ह्यात ट्रीगर २ लागू झाला अाहे. यामुळे पाच तालुक्यांत दुष्काळी सवलती लागू करण्यात अाल्या.

शासकीय यंत्रणांनी सुरवातीला केलेल्या सर्वेक्षणात सुमारे १९ हजार १६२ हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता. मात्र प्रत्यक्षात कमी पावसामुळे सर्वच पिकांची उत्पादकता कमी निघत अाहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे सरासरी उत्पादनही झालेले नाही. ही दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने विविध प्रकारच्या कर, महसूल वसुलीस स्थगिती दिली अाहे. यानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफी, रोहयोअंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, टँकरचा वापर, शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे अादी सवलतींचा समावेश अाहे. या सवलतींची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाकडून संबंधित विभागांना कळविण्यात अाले अाहे.

इतर बातम्या
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे नांदेड,...
शेतकऱ्यांना साह्यभूत नवनव्या योजना...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न...
येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा...परभणी : पूर्णा नदीवरील येलदरी धरण तसेच...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
थकीत पाच कोटी दिले तरच तूर खरेदीयवतमाळ ः खरेदी विक्री संघाचे थकीत कमिशन आणि...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...