agriculture news in marathi, drought situation but farmers become optimistic, nagar,maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; तरीही आशावाद कायम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

पावसाच्या भरवशावर ज्वारीची पेरणी केली. पण अजून पाऊस झालेला नाही. आता उगवणीची चिंता लागलीय. शेतकरी बिकट अवस्थेतून जात आहे. पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर होईल.
- शिवराज कापरे, शेतकरी, सामनगाव, ता. शेवगाव.

नगर    : जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. आशा असलेला सारा गणेशोत्सवही कोरडा गेला. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना तो अजून कुठेच बरसलेला नाही. सध्याचे चित्र पाहिले कुठेही पावसाचा मागमुस नाही, तरीही शेतकऱ्यांनी आशावाद सोडला नाही. पाऊस नक्की बरसेल या आशेने जिल्ह्याच्या काही भागात ज्वारीची पेरणी केली जात आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा जवळपास सर्वच भागात पाऊस नाही. केवळ अकोल्याचा पश्‍चिम भागातील पावसावर भंडारदरा, निळवंडे धरण भरले, मुळा धरणातही काही प्रमाणात पाणी जमा झाले असले तरी अकोल्याच्या काही भागात पाऊस नाही. अजूनही अकोल्यातील काही धरणे कोरडी आहेत. अकोल्यातच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असल्याने जिल्ह्यामधील अन्य तालुक्‍यांच्या स्थितीचा अंदाज येतो.

नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्‍यांतील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. मुळा, गोदावरी, कुकडी आणि भीमा नदीचा पट्टा सोडला तर बाकी ठिकाणी गंभीर दुष्काळी स्थिती आहे. वर्षानुवर्ष दुष्काळी असा शिक्का लागलेल्या तालुक्‍यांत तर यंदा गंभीर परिस्थिती असून आताच टॅंकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची वेळ आहे. काही ठिकाणी टॅंकर सुरू असून मागणीत वाढ होत आहे.

खरीप तर गेला, रब्बी मात्र दिलासा देणारा होता. मात्र पाऊस नसल्याने रब्बी पेरण्या सुरू होण्याला अडचणी निर्माण होत आहेत. आता परतीचा पाऊस सुरू झालाय, अगोदर पडला नाही तरी परतीच्या पावसाने अनेक वेळा मोठा दिलासा दिलेला आहे. साऱ्या पावसाळ्यात कोरडे असलेले नदी, नाले, तलाव यापूर्वी परतीच्या पावसात भरलेले आहेत.

यंदा मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. पावसाचा मागमुस दिसेना. त्यामुळे रब्बीची पेरणी होईल की नाही याची कुठलीही शाश्‍वती नसतानाही शेतकऱ्यांनी मात्र आशावाद सोडलेला नाही. पावसाचे कसलेही संकेत नसताना परतीचा तरी नक्की पडेल या आशेने काही भागात ज्वारीच्या पेरण्या केल्या जात असल्याचे पहायला मिळाले आहे.

यंदा खरिपातून फारसे काही हाती लागले नाही. आता रब्बीची आशा आहे. पाऊस नाही, येईल की नाही याची खात्री नाही तरीही पेरणी केली आहे. मात्र आता ते पेरलेलेही अडचणीत आहे. मात्र आशा सोडलेली नाही. यंदा पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी माणसांचे तसेच जनावरांचे हाल होतील, असे बोधेगाव येथील शेतकरी  लक्ष्मण तांबे यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...