राज्यात पाणीटंचाई वाढण्यास सुरवात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पाणीटंचाई कमी होत असल्याचे चित्र असतानाच, सप्टेंबर महिन्यात राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत असून, गेल्या आठवडाभरामध्ये नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाच्या दडीने राज्यातील इतरही भागात पुढील काळात टंचाई वाढणार आहे.

सोमवारपर्यंत (ता.१०) राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती या विभागातील १० जिल्ह्यांमधील २५९ गावे ३९१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याने २५८ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली. यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस (ता. २७) राज्यातील ३०९ गावे, ३२२ वाड्यांना ३११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने पाणीटंचाईत मोठी घट झाली. सप्टेंबरच्या सुरवातीला (ता. ४) राज्यातील २३८ गावे २४२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याने २३७ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र राज्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे.

अौरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, सध्या १२९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १३६ टॅंकर सुरू आहेत. नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या कोरडवाहू पट्ट्यात पाणीटंचाई वाढत आहे. गेल्या आठवडाभरात औरंगाबादमध्ये पाणीटंचाई काहीशी कमी झाली असली तरी राज्यातील २१ गावे, १४९ वाड्यामध्ये टंचाई भासू लागल्याने आणखी २१ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. नाशिकमधील १७ गावे ७९ वाड्यांमध्ये, नगरमधील १४ गावे ६२ वाड्यांमध्ये; तर पुणे जिल्ह्यातील १ गाव आणि ७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.  

जिल्हानिहाय पाणीटंचाई स्थिती
जिल्हा   गावे  वाड्या टॅंकर
नाशिक २५ १३८ १९
धुळे
जळगाव १७ ०  १३
नगर ४२ १५०  ३९
पुणे ४३  ७
सातारा १३  ५७  १०
अौरंगाबाद  १२९ १३६
जालना १२  २ १७
नांदेड
बुलडाणा ८  ० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com