agriculture news in marathi, drought situation increase due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

पुणे विभागात पाणीटंचाई वाढली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाच तालुक्यांमधील २१ गावे, १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून, सुमारे ३५ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकर धावत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. उन्हाचा चटका वाढताच या भागातील पाणीटंचाई आणखी वाढणार आहे.

पुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाच तालुक्यांमधील २१ गावे, १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून, सुमारे ३५ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकर धावत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. उन्हाचा चटका वाढताच या भागातील पाणीटंचाई आणखी वाढणार आहे.

यंदाचा पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असून, लवकरच मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. यंदा पुणे, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भूजलपातळी खालावली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत. भर पावसाळ्यातही अनेक भागांत टंचाईग्रस्त भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. आता पावसाळा संपल्यानंतर या भागात पाणीटंचाई तीव्र होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमधील १२ गावे, ६६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई वाढल्याने सुमारे १४ हजार नागरिकांना ८ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे.
साताऱ्यातील खटाव आणि माण या तालुक्यांमधील १५ गावे, ६९ वाड्यांमधील २१ हजार नागरिकांना १२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत नसली तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात पुढील काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे.
 

विभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती
तालुके   गावे वाड्या टॅंकर
बारामती  ३७
पुरंदर
दौंड
खटाव
माण १२ ६६ १०

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...