agriculture news in marathi, drought situation Regardless due to change norms | Agrowon

पैसेवारी कमी येऊनही उपयोग नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

परभणी : यंदाच्या खरीप हंगामात परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. परंतु शासनाने यावर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती अमलात आणल्यामुळे पैसेवारी ही बाब गौण ठरली आहे.

सुधारित निकषदेखील सदोष असल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आजवरच्या प्रचलित पद्धतीनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी उत्पादनातील घटीशी संबंधित असलेली पैसेवारी हा निकष होता.

परभणी : यंदाच्या खरीप हंगामात परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. परंतु शासनाने यावर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती अमलात आणल्यामुळे पैसेवारी ही बाब गौण ठरली आहे.

सुधारित निकषदेखील सदोष असल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आजवरच्या प्रचलित पद्धतीनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी उत्पादनातील घटीशी संबंधित असलेली पैसेवारी हा निकष होता.

यंदाच्या खरीप हंगामात परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील जुलै-आॅगस्ट महिन्यात ३८ ते ५५ दिवसांचा पावसाचा प्रदीर्घ खंड आला होता. वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परंतु वाढीच्या, परिपक्वतेच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे मूग, उडिद, सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.

पीक कापणीच्या प्रयोगावरून गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात घट आल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्पादनातील घटीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्व ८४९ आणि नांदेड जिल्ह्यातील १ हजार १६८ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे.

अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यामुळे शासन दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या शेतसारा माफी, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी आदी सवलती जाहीर करील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु यंदापासून दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष व कार्यपद्धती लागू केली आहे.

यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक, वनस्पती निर्देशांक, लागवड क्षेत्र, मृदा आर्द्रता, जलविषयक निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक आदी निकषांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचलित पैसेवारी या निकषाला फारसे महत्त्व राहिले नाही. त्यामुळे आजवर पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यानंतर जाहीर केल्या जाणाऱ्या दुष्काळग्रस्ताच्या सवलती जाहीर होण्याची शक्यता नाही. कमी पावसामुळे भूजल पातळी देखील घटली आहे.

खरीप पिकांच्या उत्पादनातील घटीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या परिस्थिती शासनाकडून सवलती जाहीर करणे अपेक्षित असते. दुष्काळ जाहीर करण्याचे सुधारित निकष शास्त्रीय असल्याचे सांगितले जात असले तरी ते सदोष आहेत. त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे.
-राजन क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस, भाकप, परभणी

 

प्रत्यक्षात दुष्काळी परिस्थिती आहे. परंतु जाणीवपूर्वक एवढे किचकट निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या सरकारला नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायची नाही हे यावरून स्पष्ट होत आहे.
-शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार तथा
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सभा

 

इतर बातम्या
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
सांगलीत पन्नास कोटींच्या पीककर्ज वसुलीस...सांगली : दुष्काळामुळे जिल्ह्यातील २१ हजार १४९...
सोलापूर जिल्ह्यात चार पाणीपुरवठा...सोलापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन...
आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी न...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाखाली असलेल्या...
गोंदिया जिल्ह्यात ‘जलयुक्‍त’साठी १४...गोंदिया ः राज्य दुष्काळमुक्‍त करण्याच्या...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...