agriculture news in marathi, drought situation review meeting, buldhana, maharashtra | Agrowon

पीक कापणी प्रयोग अहवालानंतर दुष्काळाबाबत घोषणा ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू असून त्यांचा अंतिम अहवाल अाल्यानंतर ३१ अाॅक्टोबरला टंचाईसदृश स्थिती जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू असून त्यांचा अंतिम अहवाल अाल्यानंतर ३१ अाॅक्टोबरला टंचाईसदृश स्थिती जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दुष्काळी परिस्थिती तसेच विविध योजनांचा आढावा सोमवारी (ता. १५) श्री. फडणवीस यांनी बुलडाणा येथे घेतला. विविध विभागांच्या त्यांनी मॅरेथाॅन बैठका घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री मदन येरावार, खासदार प्रतापराव जाधव, अामदार डाॅ. संजय कुटे, चैनसुख संचेती, आकाश फुंडकर, डाॅ. संजय रायमुलकर, डाॅ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डाॅ. निरुपमा डांगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की बुलडाणा जिल्ह्यात या हंगामात ६९ टक्के (४६० मिलीमीटर) पाऊस पडला. जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान तर ५० मंडळांमध्ये ५० ते ७५ अाणि २९ मंडळात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला. केवळ दोन मंडळांतच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. जून महिन्यात २२ दिवस, जुलैत १८, अाॅगस्टमध्ये २३ अाणि सप्टेबंरमध्ये २५ दिवस पावसात खंड पडला होता. यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांना फटका बसला अाहे. प्रकल्पांमध्येही पुरेशाप्रमाणात पाणीसाठा नाही. मोठ्या धरणांमध्ये केवळ १० तर मध्यम व लघू प्रकल्पांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक अाहे.

केंद्राने दुष्काळाबाबत तंत्रशुद्ध निकष तयार केले आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात १३ पैकी ११ तालुक्यांत ट्रीगर वन अॅक्टीव्ह झाला अाहे. सध्या पीक कापणीचे प्रयोग घेतले जात अाहेत. ३१ अाॅक्टोबरपर्यंत या प्रयोगांची एकत्रित माहिती तयार होईल. त्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाईल आणि दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी यंत्रणांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार ८७४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असून त्यांना या परिस्थितीत मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 

`जलयुक्त`मध्ये चांगले काम
जलयुक्त शिवार योजनेत बुलडाणा जिल्ह्यातील ७७० गावे निवडण्यात अाली होती. ६४१ ठिकाणी चागंले कामे झाली. सुमारे ७५ हजार टीसीएम जलसाठा तयार झाला. जिल्ह्यात ५००० शेततळ्यांचे उद्दीष्ट देण्यात अाले होते. त्यापैकी ४७७२ शेततळे मागेल त्याला शेततळे योजनेतून पूर्ण झाली. चांगले काम झाल्याने अाणखी दोन हजार शेततळ्यांचे उद्दीष्ट वाढून देण्यात अाले. जिल्ह्यात १७५३ अपूर्ण विहिरींपैकी ६५३ कामे पूर्ण झाली. धडक सिंचन विहीर योजनेतून १३००० विहिरींपैकी ११ हजार १२५ पूर्ण झाल्या आहेत. जिगाव प्रकल्पातून जून २०२० पर्यंत २५००० हेक्टर सिंचनाचे उद्दीष्ट ठेवण्यात अाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

घरपोच दारू कपोलकल्पित
राज्य सरकारने घरपोच दारुबाबत कुठलाही निर्णय घेतला नसून या कपोलकल्पीत बातम्या अाहेत. शासनाने याबाबत काहीही ठरविलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

२०० शेडनेटला तत्काळ मंजुरी
बुलडाणा जिल्हा सीड हब करण्याच्या दृष्टीने अारकेवाय योजनेतून जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार तत्काळ २०० शेडनेट मंजूर करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...