agriculture news in marathi, Drought stricken farmer suicides | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात शेतकरी आत्महत्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या, तरी वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या लागोपाठ होणाऱ्या आत्महत्यांमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या, तरी वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या लागोपाठ होणाऱ्या आत्महत्यांमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, जानेवारीपासून दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये साधारणतः २२ ते ४५ वयोगटातील शेतकऱ्यांचा समावेश चिंताजनक आहे. शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या विचार करायला लावणारी असली, तरी अशा आत्महत्यांमागची कारणेदेखील तितकीच विचार करायला लावणारी आहेत.

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जात असून, अशी मदत देताना शेतकऱ्याच्या नावावर शेती, सावकार अथवा बॅँकांचे कर्ज असल्याची खात्री केली जाते.

पोलिस, महसूल व कृषी विभागाकडून सर्वंकष चौकशी केली जात असल्याने एकूण ८९ शेतकऱ्यांपैकी फक्त २६ शेतकऱ्यांनीच कर्जबाजारीपण व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ४९ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमागे वैैयक्तिक कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात प्रामुख्याने नैराश्य, घरगुती भांडणे, व्यसन अशा कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सरकारी अहवालात म्हटलेले आहे.

आत्महत्येच्या १४ घटनांची चौकशी अद्यापही सुरू आहे.
सर्वाधिक आत्महत्या मालेगाव, दिंडोरीपाठोपाठ बागलाण तालुक्यात झाल्या आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करताना पहिल्या टप्प्यातून दिंंडोरी तालुक्याला वगळले होते. नंतर काही मंडळांचा समावेश करण्यात आला. निफाड तालुक्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही या तालुक्याला दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आले. दुष्काळी येवला, चांदवड, देवळा या तालुक्यांत मात्र शेतकरी आत्महत्यांची संख्या अगदीच अल्प आहे. पेठ व सुरगाणा तालुक्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. नोव्हेंबरअखेरच जिल्ह्यात चारा, पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यात आत्महत्यांच्या वाढत्या सत्राने भर पडली आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...