औरंगाबादेत शेवगा प्रतिक्‍विंटल १०,००० ते १४,००० रुपये

शेवगा
शेवगा

औरंगाबाद : आवक घटल्याने औरंगाबाद बाजार समितीमध्ये शेवग्याचे दर वधारले आहेत. शनिवारी (ता.४) ५ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला १०,००० ते १४,००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  बाजार समितीमध्ये शनिवारी हिरवी मिरचीची ५१ क्‍विंटल आवक होऊन तीस १५०० ते २००० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ४५७ क्‍विंटल तर दर ५०० ते ३००० रूपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ५१ क्‍विंटल; तर दर १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचा दर  १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. कोबीची आवक ५७ क्‍विंटल; तर दर १००० ते १६०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला २००० ते ३५०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा राहिला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा; तर कोथंबीरचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक     किमान     कमाल
आवळा     ११     १२००     २०००
मोसंबी     ४९     १०००     ३५००
डाळींब     १४२     १५०     ३०००
पपई     ३४     ४००     ७००
सिताफळ     ८२     १०००     ३०००
बोर     २७     १०००     १६००
संत्रा     २२     २०००     ३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com