agriculture news in marathi, Drumstick per quintal 2500 to 4000 rupees | Agrowon

जळगावात शेवगा प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेवग्याच्या शेंगांना मंगळवारी (ता.६) २५०० ते ४००० रुपये आणि सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक फक्त पाच क्विंटल झाली. 

जिल्ह्यात शेवग्याची शेती फारशी नाही. केवळ बांधावरचे पीक म्हणून शेवग्याचे उत्पादन शेतकरी घेतात, तर पारोळा, भडगाव, चाळीसगाव भागात काही शेतकरी एक ते दीड एकरात शेवग्याचे उत्पादन घेत आहेत. आवक तशी कमीच असते. मागील महिन्यात शेवग्याची फारशी नव्हती. आवक फक्त शनिवारी किंवा बुधवारी व्हायची. पुरवठा कमी असल्याने अधिकचे दर असल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी म्हटले आहे. 

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेवग्याच्या शेंगांना मंगळवारी (ता.६) २५०० ते ४००० रुपये आणि सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक फक्त पाच क्विंटल झाली. 

जिल्ह्यात शेवग्याची शेती फारशी नाही. केवळ बांधावरचे पीक म्हणून शेवग्याचे उत्पादन शेतकरी घेतात, तर पारोळा, भडगाव, चाळीसगाव भागात काही शेतकरी एक ते दीड एकरात शेवग्याचे उत्पादन घेत आहेत. आवक तशी कमीच असते. मागील महिन्यात शेवग्याची फारशी नव्हती. आवक फक्त शनिवारी किंवा बुधवारी व्हायची. पुरवठा कमी असल्याने अधिकचे दर असल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी म्हटले आहे. 

बाजारात मंगळवारी वाटाण्याच्या शेंगांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ११०० ते १८०० आणि सरासरी १३०० रुपये दर होता. भेंडीची २१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० आणि सरासरी १७०० रुपये दर मिळाला. लिंबूची आठ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १६०० आणि सरासरी ११०० रुपये दर होता. आवळ्याची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १००० ते २००० आणि सरासरी १५०० रुपये दर होता. अद्रकची २० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २५०० आणि सरासरी १८०० रुपये दर होता. मेहरूणच्या बोरांची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० रुपये दर मिळाला.

वाल शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २२०० आणि सरासरी १५०० रुपये दर होता. वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १५०० व सरासरी १००० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३२०० आणि सरासरी २२०० रुपये दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...