agriculture news in marathi, drumstick rate per ten kilo 350 to 450 in Satara | Agrowon

सातारा बाजारात दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) शेवगा, मेथी तेजीत असून पावटा, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची सात क्विंटल आवक झाली अाहे. दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) शेवगा, मेथी तेजीत असून पावटा, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची सात क्विंटल आवक झाली अाहे. दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वाटाण्याची एक क्विंटल आवक झाली असून, दहा किलो वाटाण्यास ६०० ते ७०० असा दर मिळाला. गवारीची आठ क्विंटल आवक झाली असून दहा किलो गवारीस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. हिरवी मिरचीची २७ क्विंटल आवक झाली. दहा किलो मिरचीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. आल्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलो आल्यास ४५० ते ५०० मिळाला आहे. वांग्याची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलो वांग्यास १५० ते २५० दर मिळाला आहे. ओल्या भुईमूग शेंगेची २२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस शेंगेस २५० ते ३०० दर मिळाला आहे. टोमॅटोची ५२ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस ८० ते १३० असा दर मिळाला आहे. फ्लॉवरची २३ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २५० दर मिळाला आहे. कांद्याची १०५ क्विंटल आवक झाली. कांद्यास दहा किलोस ९० ते १०० असा दर मिळाला. पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. पावट्याची सहा क्विंटल आवक झाली असून दहा किलोस ४०० ते ५०० दर मिळाला आहे. 

पालेभाज्यात मेथी तेजीत असून कोथिंबीरीच्या आवकेत वाढ झाली आहे. मेथीची १३०० जुड्याची आवक होऊन मेथीस शेकड्यास १००० ते २००० असा दर मिळाला आहे. कोथिंबीरीची २००० जुड्याची आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ५०० ते ८०० दर मिळाला आहे. फळात आंब्याची ९०० बॉक्‍स (प्रतिबॉक्‍स एक डझन) आवक झाली. आंब्यास प्रतिबॉक्‍सला ५० ते २५० असा दर मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...