agriculture news in Marathi, dry and hot weather possibility, Maharashtra | Agrowon

उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढलेला आहे. शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट होती. तर, मध्य महाराष्ट्रात तापमानात थोडी घट झाल्याचे दिसून आले. चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज (ता. २६) राज्यात उष्ण व मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढलेला आहे. शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट होती. तर, मध्य महाराष्ट्रात तापमानात थोडी घट झाल्याचे दिसून आले. चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज (ता. २६) राज्यात उष्ण व मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तर जळगाव, सोलापूर, नांदेड, परभणी येथे तापमान ४२ अशांच्या पुढे होते. इतरही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. उन्हाचा चटका कायम असल्याने अनेक दिवसांपासून राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. सकाळपासून उन्हाच्‍या झळा बसत असल्याने बाहेर पडणे तापदायक ठरत आहे. तर दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळीही उकाडा चांगलाच वाढला आहे. 

शनिवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३९.५ (३.३), जळगाव ४२.८ (०.५), कोल्हापूर ३९.४(४.५), महाबळेश्वर ३३.६ (४.२), मालेगाव ४१.६ (१.६), नाशिक ३७.५ (०.१), सांगली ४०.३ (३.५), सातारा ४०.२ (५.०), सोलापूर ४३.५(३.६), अलिबाग ३४.२ (१.०), डहाणू ३५.७ (१.३), सांताक्रूझ ३४.४ (०.९), रत्नागिरी ३३.३ (०.४), औरंगाबाद ४१.८ (२.६), नांदेड ४४.५ (३.०), परभणी ४५.० (३.२), अकोला ४४.४ (२.५), अमरावती ४३.६ (१.६), बुलडाणा ४१.० (३.१), बह्मपुरी ४५.८ (३.२), चंद्रपूर ४६.६ (३.४), गोंदिया ४४.० (१.३), नागपूर ४६.० (३.२), वाशीम ४३.०, वर्धा ४५.० (२.२). 

मॉन्सूनची थोडीशी वाटचाल
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आठवडाभरानंतर थोडीशी वाटचाल करीत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. गेल्या शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल झाला होता. गुरुवारपर्यंत (ता. ३०) मॉन्सून आणखी काही भागांत प्रगती करण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...