agriculture news in marathi, Dry fennel pomegranate of Satabara | Agrowon

डाळिंब पीकविमा भरण्यात सातबाराचा खोडा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

सांगली : गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याने ऑनलाइन सातबारा मिळत नाही. तलाठ्याकडे गेल्यानंतर हस्तलिखित सातबाराची मागणी केल्यानंतर हस्तलिखित सातबारा देता येत नाही, अशी उत्तरे देऊन शेतकऱ्यांना परत पाठविले जाते आहे. त्यामुळे डाळिंब विमा कसा भरायचा असा प्रश्‍न डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. परिणामी या वर्षी एक टक्काही शेतकऱ्यांना विमा भरता आला नसून, तलाठी दाखल्याने डाळिंब विमा भरण्याला खोडा बसला आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

सांगली : गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याने ऑनलाइन सातबारा मिळत नाही. तलाठ्याकडे गेल्यानंतर हस्तलिखित सातबाराची मागणी केल्यानंतर हस्तलिखित सातबारा देता येत नाही, अशी उत्तरे देऊन शेतकऱ्यांना परत पाठविले जाते आहे. त्यामुळे डाळिंब विमा कसा भरायचा असा प्रश्‍न डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. परिणामी या वर्षी एक टक्काही शेतकऱ्यांना विमा भरता आला नसून, तलाठी दाखल्याने डाळिंब विमा भरण्याला खोडा बसला आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

जिल्ह्यात डाळिंबाचे सुमारे ८ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात सुमारे ९० टक्के मृग बहर धरला जातो. डाळिंबाचा मृग बहर सुरू झाला आहे. याचा विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै आहे. मृग बहर मोठ्या संख्येने धरला जातो. अनेक शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. डाळिंब विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांत जागृती झाली आहे. विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव शेतकरी करू लागला आहे.

मात्र, सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मुळात सातबारा यावर पिकांची नोंद केली आहे. तर काही ठिकाणी सर्व्हर बंद असल्याने डाळिंब पिकाची नोंद झालेली नाही. त्यामुळे सातबारा उतारा मिळणे कठीण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील ऑनलाइन सातबाराचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, तलाठी अजून सातबारा ऑनलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे सातबारा देता येत नाही. उदाहरण सांगायचे झाल्यास एका गटात पाच शेतकरी आहेत. पण त्या गटातील एका शेतकऱ्याची डाळिंबाची बाग आहे.

वास्तविक पाहता सातबाऱ्यावर पीक पाहणी या रकान्यात डाळिंबाची नोंद होते. पण ज्या शेतकऱ्याची डाळिंबाची बाग आहे, त्या शेतकऱ्याचे नाव असणे गरजेचे आहे. पण तलाठी हे नाव नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर डाळिंब पिकाची नोंद आहे. त्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळत नाही.

विम्यासाठी लागणारी कागदपत्रे

  •  विमा अर्ज.
  •  ७/१२ उतारा.
  •  लागवडीचा दाखला.
  •  आधारची झेरॉक्‍स.
  •  मतदान कार्ड झेरॉक्‍स.
  •  बॅंक पासबुक.

सध्या सातबारा ऑनलाइच करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सातबारा देता येत नाहीत. त्यावर मार्ग काढून शेतकऱ्यांना सातबारा लवकर देऊ.
- यू. व्ही. जानकर, तलाठी, शेटफळे, माडगुळे, ता. आटपाडी, जि. सांगली.

पीकविम्यासाठी अटी विचित्र आहेत. त्यामुळे याचा फायदाच होत नाही. पीकविम्यासाठी सातबारा हा आवश्‍यक केला आहे. पण सातबारा मिळतच नाही. सातबारा मागण्यासाठी गेल्यानंतर तलाठ्याकडून अनेक कारणे दिली जात आहेत.
- सर्जेराव खिलारे, डाळिंब उत्पादक शेतकरी, करगणी, ता. आटपाडी.

 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...