agriculture news in Marathi, dry weather condition in state, Maharashtra | Agrowon

राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी लावल्यानंतर राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक ठिकाणी ४२ अंशांपर्यंत गेलेले तापमानाचा पारा ३८ अंशाच्याही खाली घसरला आहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. १८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.   

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी लावल्यानंतर राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक ठिकाणी ४२ अंशांपर्यंत गेलेले तापमानाचा पारा ३८ अंशाच्याही खाली घसरला आहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. १८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.   

  सूर्य तळपू लागल्याने विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या पुढे गले होते. तर चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानाचा पारा ४३ अंशांच्या वर सरकला होतो. मात्र रविवारपासून राज्यात पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला असून, आकाशात सकाळपासूनच ढग गोळा झाल्याने तापमानात घट झाली आहे.

कोकण वगळता सर्वत्र कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांची कमी झाले होते. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात कमाल तापमान ३३ ते ४२ अंशांच्या जवळपास, मराठवाड्यात ३४ ते ४२ अंश, मध्य महाराष्ट्रात २८.७ ते ४२ अंश आणि कोकणात दिवसाचे तापमान ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. 

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित होऊन हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मात्र राज्यातील पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती काहीशी निवळल्याने राज्यात बुधवारी दुपारपर्यंत मुख्यत: निरभ्र आकाश होते. आजपासून (ता. १७) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे, तर तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  
बुधवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.६ (-१.२), नगर ४१.७ (२.३), धुळे ३७.६, जळगाव ३८.८ (-२.५), कोल्हापूर ३६.८ (-०.२), महाबळेश्वर २८.७ (-३.२), मालेगाव ३५.६ (-४.५), नाशिक ३४.७ (-३.२), सांगली ३७.८ (-०.८), सातारा ३६.१ (-०.७), सोलापूर ३८.३(-२.२), अलिबाग ३४.२ (२.४), डहाणू ३५.४ (२.६), सांताक्रूझ ३४.६ (१.८), रत्नागिरी ३२.६ (०.५), औरंगाबाद ३४.८ (-३.७), नांदेड ४२.० (१.०), उस्मानाबाद ४१.१ (-२.०), परभणी ३८.० (-२.५), अकोला ३७.५ (-३.६), अमरावती ३६.२ (-५.२), बुलडाणा ३३.४ (-४.२), बह्मपुरी ४०.८ (०.२), चंद्रपूर ४२.२ (०.५), गोंदिया ३५.५ (-४.९), नागपूर ३८.१ (-२.५), वाशीम ३७.०, वर्धा ३७.८ (-३.८), यवतमाळ ३६.८ (-३.९). 

इतर अॅग्रो विशेष
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...