राज्यात शुक्रवारपासून कोरडे हवामान

राज्यात शुक्रवारपासून कोरडे हवामान
राज्यात शुक्रवारपासून कोरडे हवामान

पुणे ः गेल्या आठवड्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र ते आग्नेय अरबी समुद्रादरम्यान तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उद्यापर्यंत (गुरुवार) ढगाळ हवामान राहील. शुक्रवार (ता.१३) पासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, पुन्हा उन्हाचा चटका वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.   आज (बुधवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आणि उद्या (गुरुवारी) विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, वाशीम, अकोला भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. मात्र, ढगाच्या आच्छादनामुळे उन्हाचा पारा किंचित घटला आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत खांदेशातील मालेगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.  कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहत असून दुपारनंतर ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. मंगळवारी हीच स्थिती कायम होती. ढगाळ हवामानामुळे सायंकाळनंतर हवेत पुन्हा गारवा तयार होत आहे. ढगाळ हवामानामुळे कोकणातील रत्नागिरी येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घटून ३५.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. किमान तापमान २० ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३३ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. किमान तापमान १७ ते २३ अंश सेल्सिअसच्या या दरम्यान होते. मराठवाड्यात उन्हाचा किंचित चटका असल्याने या भागातील कमाल तापमान ३६ ते ३९, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात उन्हाची झळ कायम असल्याने कमाल तापमानाचा पारा ३८ ते ४०, तर किमान तापमानाचा पारा २० ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.   मंगळवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) ३४.८, अलिबाग ३२.१, रत्नागिरी ३५.६, डहाणू ३१.९, पुणे ३७.२, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३३.४, मालेगाव ४१.४, नाशिक ३७.९, सातारा ३६.१, सोलापूर ३८.९, औरंगाबाद ३६.८, उस्मानाबाद ३६.२, परभणी शहर ३९.७, नांदेड ३८.५, बीड ३८.०, अकोला ४०.७, अमरावती ३८.८, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०.७, गोंदिया ३९.०, नागपूर ३८.९, वाशीम ३९.५, वर्धा ३९.५, यवतमाळ ३९.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com