agriculture news in Marathi, dry weather possibilities in state, Maharashtra | Agrowon

राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात आठवडाभर सुरू असलेला पाऊस थांबणार अाहे. उद्यापासून (ता. २२) राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील कमाल तापमान कमी झाले असून, रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये काेकण, दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. 

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात आठवडाभर सुरू असलेला पाऊस थांबणार अाहे. उद्यापासून (ता. २२) राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील कमाल तापमान कमी झाले असून, रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये काेकण, दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. 

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात गेला आठवडाभर सकाळपासून वाढलेल्या उन्हाच्या चटक्यानंतर दुपारी उकाडा वाढत आहे. तर सांयकाळनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला ३८ अंशांवर गेलेले दिवसाचे तापमान कमी झाले आहे. तर किमान तापमानाच चढ-उतार होत आहेत. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे नीचांकी १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

थायलंडच्या अखातामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले अाहे. उद्यापर्यंत (ता. २२) ही स्थिती उत्तर अंदमान समुद्राकडे सरकून त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. तर नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) आज (ता. २१) देशभरातून परतण्याची शक्यता असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.४ (१९.९), नगर - (१८.२), जळगाव ३७.२ (२०.६), कोल्हापूर ३१.१ (२०.९), महाबळेश्‍वर २५.६ (१७.८), मालेगाव ३५.६ (२१.८), नाशिक ३३.८ (१८.८), सांगली ३२.६ (१९.०), सातारा ३१.८ (१९.६), सोलापूर ३४.३ (१९.६), सांताक्रूझ ३४.० (२४.५), अलिबाग ३३.३ (२३.९), रत्नागिरी ३३.६ (२३.३), डहाणू ३४.१ (२५.६), आैरंगाबाद ३४.४ (१८.४), परभणी ३४.१ (१६.०), नांदेड ३४.० (१९.०), उस्मानाबाद ३२.७, अकोला ३६.६ (२१.३), अमरावती ३६.६ (२०.४), बुलडाणा ३४.० (२१.०), चंद्रपूर ३५.६ (२२.६), गोंदिया ३४.५ (२१.०), नागपूर ३५.१ (१९.६), वर्धा ३५.८ (१९.८), यवतमाळ ३६.० (२०.०).

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...