agriculture news in Marathi, Dry weather prediction in state from Wednesday, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

पुणे : लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. राज्यात सोमवारपर्यंत (ता. ९) हलक्या ते मध्यम पावसाचा, तर मंगळवारपासून (ता. १०) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर, रविवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. राज्यात सोमवारपर्यंत (ता. ९) हलक्या ते मध्यम पावसाचा, तर मंगळवारपासून (ता. १०) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर, रविवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात अस्थिरता निर्माण झाली असून, त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. दक्षिण कोकणापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी बहुतांशी भागांत ढग असल्याने सर्वच ठिकाणच्या तापमानात थोडीशी घट झाली. काही ठिकाणी पाऊसही पडला. शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारपर्यंत राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडणार असून, मंगळवारपासून हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे.   

शनिवार (ता. ७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१, नगर ३८.०, जळगाव ३९.७, महाबळेश्वर ३०.६, मालेगाव ३९.६, नाशिक ३६.३, सांगली ३५.८, सातारा ३५.८, सोलापूर ३७.९, मुंबई ३३.१, अलिबाग ३२.७, रत्नागिरी ३१.०, डहाणू ३४.०, उस्मानाबाद ३७.६, आैरंगाबाद ३७.५, परभणी ४०.०, नांदेड ४०.०, अकोला ४०.६, अमरावती ३९.८, बुलडाणा ३७.५, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वर्धा ४१.९, यवतमाळ ४०.०.

विखळे, वेटणे येथे गारपीट
विखळे, वेटणे (जि. सातारा) येथे शनिवारी दुपारी गारपीट झाली. तसेच जिल्हयातील नागठाणे (ता. सातारा), चिलारवाडी, विरळी, वडजल येथेही जोरदार पावसाने हजरी लावली. पुणे िजल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर, डिंगोरे आणि ओतूर भागातही पाऊस झाला. विदर्भातील अमरावती  येथेही पावसाने हजेरी लावली होती.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...