agriculture news in marathi, dryland cotton affected in Akola, Buldana district | Agrowon

अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू कपाशीला फटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली असली, तरी खंड व परतीच्या पावसाअभावी कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक भागांत कोरडवाहू कपाशीचा हंगाम येत्या महिनाभरातच पूर्ण होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कपाशीचे उभे पीक आता सुकलेले दिसत असून, झाडांवर लागलेल्या बोंडांमधून कापूस उमलत आहे. या कापसाची वेचणी झाल्यानंतर अनेक शेतांमधील कपाशीचे पीक काढून टाकण्यायोग्य होईल, अशी स्थिती आहे.

अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली असली, तरी खंड व परतीच्या पावसाअभावी कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक भागांत कोरडवाहू कपाशीचा हंगाम येत्या महिनाभरातच पूर्ण होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कपाशीचे उभे पीक आता सुकलेले दिसत असून, झाडांवर लागलेल्या बोंडांमधून कापूस उमलत आहे. या कापसाची वेचणी झाल्यानंतर अनेक शेतांमधील कपाशीचे पीक काढून टाकण्यायोग्य होईल, अशी स्थिती आहे. अकोला जिल्ह्यात एकूण लागवडीच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक क्षेत्र हे कोरडवाहू कपाशीचे आहे. 

या हंगामात वऱ्हाडात अकोला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, तर शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठली नाही. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड मोठा राहिल्याने कोरडवाहू कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला. पीक फारसे जोमदार वाढले नाही. शिवाय फूल, पात्या धरण्याच्या, बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस, ओलावा नसल्याने सर्वाधिक फटका बसला. गेल्या काही दिवसांत हलक्‍या जमिनीतील पीक दिवसा सुकल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची अपेक्षा लागलेली होती. मात्र, कुठेच हा पाऊस बरसला नाही. 
अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांना कोरडवाहू कापूस उत्पादनातून उत्पादन खर्च मिळेल, अशी शक्‍यता दिसत नाही. बाळापूर तालुक्‍यात गायगाव, निमकर्दा, पारस व इतर गावांमध्ये कपाशी पिकाची दुरवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. कोरडवाहू शेतातील कपाशीच्या झाडावर आठ ते दहा बोंड्या धरलेल्या दिसून आल्या. या भागात कुठे पीक हिरवेगार होते, मात्र त्यावर कीडींचा, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. तर, कुठे उभे पीक दुपारच्या वेळेत सुकलेले दिसले. झाडांवर असलेल्या बोंड्या अर्धवट स्वरूपात उमललेल्या होत्या.  सध्या लागलेल्या बोंडामधील कापसाची वेचणी केल्यानंतर हे पीक पूर्णतः खाली होईल, अशी स्थिती आहे. 

ही सर्व लक्षणे कपाशीचा हंगाम लवकरच संपण्याच्या दिशेने निर्देश करीत आहेत. दर वर्षी हिवाळ्यात कोरडवाहू कपाशी पिकाच्या स्थितीत सुधारणा होऊन शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होत असते. यंदा मात्र गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून पिकाला हवे असलेले पाणी, ओलावा नसल्याने उभे पीक कोमेजत आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळण्याची शक्‍यता नाही.

बुलडाण्यातही बिकट अवस्था
कापसाचे क्षेत्र अधिक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातसुद्धा कोरडवाहू कपाशीची स्थिती बिकट आहे. पीक होरपळले असून, झाडांवर लागलेल्या बोंड्या उमलत आहेत. एक किंवा दोन वेचण्या केल्यानंतर कपाशीचे पीक उपटून टाकावे लागण्याची शक्यता आहे. कपाशी उपटून रब्बीची लागवड करावी, तर पाण्याची व्यवस्था नसल्याने हा पर्यायसुद्धा शेतकऱ्यांपुढे उपलब्ध नाही. 

मी या वर्षी सहा एकरांत कोरडवाहू कापूस लागवड केली होती. परंतु, पावसाच्या अनियमितपणामुळे पिकाची वाढ झाली नाही. सध्या माझ्या शेतातील कपाशीला दोन ते चार बोंडे लागले आहेत. एकरी ८० ते ९० किलो कापूस होईल, असे दिसते. यातून उत्पादन खर्चही निघण्याची शक्‍यता नाही. शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.
- मार्तंड रघुनाथ डिवरे, शेतकरी, महाळुंगी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...