agriculture news in marathi, due to adverse weather conditions pest-disease risks on crops, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर कीड-रोगांचा धोका
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

कोल्हापूर  ः अतिपावसाचे संकट दूर होते न होते तोच जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कडक ऊन पडत अाहे. प्रतिकूल हवामानामुळे भात, भुईमूग आदी पिकांत किडी-रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हवेतील आर्द्रता, ढगाळ वातावरण, अचानक वाढलेले तापमान असे वातावरण शिवारात आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात भात, भुईमूग आदी पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. आठ दिवसांपासून विशेष करून पश्‍चिम भागात पाऊस थांबला आहे. गेले तीन महिने संततधार बरसणारा पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु त्यानंतर मात्र उष्णतेत एकदम वाढ झाली.

कोल्हापूर  ः अतिपावसाचे संकट दूर होते न होते तोच जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कडक ऊन पडत अाहे. प्रतिकूल हवामानामुळे भात, भुईमूग आदी पिकांत किडी-रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हवेतील आर्द्रता, ढगाळ वातावरण, अचानक वाढलेले तापमान असे वातावरण शिवारात आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात भात, भुईमूग आदी पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. आठ दिवसांपासून विशेष करून पश्‍चिम भागात पाऊस थांबला आहे. गेले तीन महिने संततधार बरसणारा पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु त्यानंतर मात्र उष्णतेत एकदम वाढ झाली.

वाढते तापमान मध्येच ढगाळ हवामान आदींचा विपरीत परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे. खरिपातील मुख्य पिक असलेल्या जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात भातपिकावर खोड किडा, तपकिरी तुडतुडे, निळे भुंगेरे, पाने खाणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढली आहे. भुईमुगावर पाने गुंडाळणारी अळी, मावा तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी  याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहे.

पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु पश्चिमेकडे झालेल्या पावसाने हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील नद्यांना पाणी आले. पर्यायाने नदीकाठावरील कृषिपंप काढावे लागले. कडक ऊन असले तरी पंप काढून ठेवल्याने खरीप पिकांना पाणी देणे अशक्‍य बनले होते. सध्या नद्यांचे पाणी ओसरले आहे. कोणत्याही परिस्थितीत उसासहित अन्य खरीप पिकांना पाण्याची गरज असल्याने या भागातील शेतकरी तातडीने पिकांना पाणी देण्यासाठी गडबड करीत आहे. वाढते तापमान पिकांसाठी प्रतिकूल ठरत आहे. अचानक वाढलेल्या ऊन व आर्द्रतेमुळे यंदाचा खरीप वाचविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

 कृषी विभागाने दिल्या सूचना
भातावरील खोड किडा, तपकिरी तुडतुडे, निळे भुंगेरे, पाने खाणारी अळी तसेच करपा, कडा करपा यांसारख्या कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या कीडनाशकांची फवारणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...