agriculture news in marathi, Due to cloudy weather, farmers worry | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ, उष्ण वातावरण आहे. मळणीवर आलेली ज्वारी, हरभरा पिकाच्या नुकसानीची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ, उष्ण वातावरण आहे. मळणीवर आलेली ज्वारी, हरभरा पिकाच्या नुकसानीची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

हाती घास आला असताना अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सीअसपर्यंत पोचले आहे. उष्णता वाढल्याने सिंचनासाठी पाण्याची गरज वाढली आहे. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना फारशी अडचण नाही. परंतु पाट पद्धतीने कांदा, हरभरा व मका पिकाचे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. हलक्‍या, मध्यम प्रकारच्या जमिनीत अधिकचे पाणी लागत आहे. दिवसा चार दिवस व रात्री दोन दिवस वीजपुरवठा सुरू असतो. अर्थातच रात्रंदिवस शेतात सिंचनाच्या लगबगीत शेतकरी आहेत.

चोपडा, जळगाव, पाचोरा, रावेर, धुळे, शिरपूर, नंदुरबार, शहादा, तळोदा भागांत अनेक ठिकाणी हरभऱ्याची कापणी झाली. मळणीसाठी शेतात त्याचे ढीग आहेत. ते वाळविण्यासाठी ताडपत्रीने झाकले नाहीत. काही ठिकाणी ज्वारीची कापणी पूर्ण होऊन कणसेही मळणीसाठी गोळा करण्यात आली आहेत. परंतु अशातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ज्वारी, हरभरा उत्पादकांमध्ये भीती आहे. गव्हाचे पीक जोमात असून, दाणे भरले आहेत. आता अवकाळी पाऊस, हलका वाराही आला तर पीक लोळेल व मोठे नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यावल, रावेर, मुक्ताईनगर, शहादा व शिरपूर भागात केळी काढणीवर आहे. पक्व होत अलेल्या घडांची काढणी शेतकरी करून घेत असल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...