agriculture news in marathi, due to the current situation'The state and the country's loss | Agrowon

'सध्याच्या स्थितीमुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान'
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नगर ः राज्यात आणि देशात सध्या परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी, कामगार, तरुण, समान्य नागरिक, महिला कोणीच समाधानी नाही. राज्याला आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याऐवजी राजरोसपणे मोठे लोक बॅंका बुडवत आहेत, घोटाळे होत आहेत, सीमेवर सैनिक मरत आहेत, असे असताना केंद्रातील कोणीच जबाबदार व्यक्ती बोलत नाही. सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. ही परिस्थिती देशाचे आणि राज्याचे नुकसान करणारी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

नगर ः राज्यात आणि देशात सध्या परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी, कामगार, तरुण, समान्य नागरिक, महिला कोणीच समाधानी नाही. राज्याला आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याऐवजी राजरोसपणे मोठे लोक बॅंका बुडवत आहेत, घोटाळे होत आहेत, सीमेवर सैनिक मरत आहेत, असे असताना केंद्रातील कोणीच जबाबदार व्यक्ती बोलत नाही. सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. ही परिस्थिती देशाचे आणि राज्याचे नुकसान करणारी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

भाजप व शिवसेना या जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवण्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हल्लाबोल यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज श्रीगोंदा (जि. नगर) येथून सुरवात झाली.

त्यानंतर शेवगावला जाताना अजित पवार यांनी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, सुजीत झावरे, माणिक विधाते या वेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, केंद्रात शरद पवार कृषिमंत्री असताना दुष्काळ, गारपीट किंवा अन्य कोणत्याही संकटाने शेतकरी कोलमडला तर त्याला आधार देण्याचे काम सरकार करत होते. शरद पवार यांच्या काळातच शेतकऱ्यांना दोन टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झाला. संशोधनाला अधिक निधी दिला. दुधाला दर नव्हता, तर दूध पावडर करण्यासाठी आमच्या सरकारने अनुदान दिले. अन्नधान्य निर्यातीला प्राधान्य दिले. त्यामुळे शेतकरी आनंदी आणि समाधानी होता.

आता मात्र शेतकऱ्यांना जगणे महाग झाले आहे. किमान आधारभूत दर देण्याची घोषणा निव्वळ दिशाभूल आहे. कर्जमाफी हे फक्त नाटक असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. बोंड अळीच्या नुकसानीची मदत, तुडतुड्यामुळे धानाचे नुकसान झाले, त्यांना मदत न देता केवळ खोटी आश्‍वासने सरकाने दिली आहेत. सध्याची राज्याची आणि देशाची स्थिती गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर देश आणि राज्य खूप मागे जाईल. भाजप व शिवसेना हे पक्ष आमचे विरोधक असून, त्यांच्या विरोधात समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे प्लॅनिंग वरिष्ठ पातळीवर केले जात  आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...