agriculture news in marathi, Due to the diversification of agriculture, the arrival of Pune has come down | Agrowon

शेतीमाल भिजल्याने पुणे बाजारात आवक घटली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली हाेती. पावसामुळे अनेक राज्याच्या विविध भागांत शेतीमाल भिजल्याने आवक घटली असून, यामध्ये फ्लाॅवर व पावट्याचा समावेश आहे. यामुळे या भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली हाेती. पावसामुळे अनेक राज्याच्या विविध भागांत शेतीमाल भिजल्याने आवक घटली असून, यामध्ये फ्लाॅवर व पावट्याचा समावेश आहे. यामुळे या भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक कोबी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे २० टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेंपो शेवगा, इंदूर येथून ४ टेंपो गाजर, बंगलाेर येथून एक टेंपाे आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली हाेती.

स्थानिक भागातून सातारी आले सुमारे दीड हजार पोती, टॉमेटोे ५ हजार क्रेट्स, फ्लॉवर १० टेंपो, कोबी १५ टेंपो, गवार ५ टेंपो, भेंडी १० टेंपो, शेवगा ४ टेंपो, ढोबळी मिरची १२ टेंपो, हिरवी मिरची ६ टेंपो, मटार सुमारे २५० गोणी, काकडी १० टेंपो, कारली ८ टेंपो, पावटा ४ टेंपो, भुईमूग १०० पोती, कांदा सुमारे ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ८०-१२०, बटाटा : १४०-१७०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ४५०-४००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान : सुरती ३००-४००, टोमॅटो : ४०-८०, दोडका : २००-३०० हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ७०-१५०, चवळी : १५०-२०० काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५० पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२२०, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : १४०-१८०, कोबी : ३०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१०० ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : २००-४००, गाजर : १२०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : १००-२०० कोहळा : १००-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : २५०-३५०, पावटा : २००-२२०, मटार : ४००-४५०, तांबडा भोपळा : ६०-१०० सुरण : २४०-२६०, मका कणीस : ६०-१२० नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभांज्यामध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ५००-८००, शेपू : ४००-६००, कांदापात : ४००-६०० चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३०० अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-७००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-६००.

फुलबाजार
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : ८०-१५०, बिजली : ३०-६०, कापरी : १०-४०, शेवंती ४०-६०, ॲस्टर : १०-१५, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १०-२५, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ७०-१२०, लिली बंडल : ८-१२ जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन : ८०-१२०.

फळबाजार
रविवारी (ता. २) येथील फळबाजारात  
मोसंबी सुमारे ७० टन, संत्री १० टन, डाळिंब ३०० टन, पपई २५ टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिकू ५०० गाेणी आणि बॉक्स, पेरू ३०० क्रेट्स, कलिंगड २० टेंपो, खरबूज १० टेंपो, सफरचंद सुमारे ८ हजार पेटी, सीताफळ १०  टन आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १५०-४००, मोसंबी : (३ डझन) : १००-२००, (४ डझन ) : ३०-८०, संत्रा : (३ डझन) १२०-२५०, (४ डझन) : ४०-१००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-६०, गणेश १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई  : ५-२०, चिकू : १००-७००, पेरू (२० किलो) : ४००-८००, सीताफळ : १०-१६०, सफरचंद - सिमला (२५ ते ३० किलो) १४००-२६००, पिअर (१४ ते १५ किलो) १०००-१४००, प्लम (५ ते ६ किलो) ६००-७००, आंबा : चौसा (५ किलो) १५००-१६००.

मटण मासळी
श्रावण महिन्यामुळे मासळीची मागणी अद्याप घटलेलीच आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. २) खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची ३०० किलो, नदीची ३०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ६ टन आवक झाली हाेती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १२००, मोठे : १४०० , मध्यम : ९०० लहान : ५५०, भिला : ४५०, हलवा : ४८०, सुरमई : ४००, मोठे ४८० रावस-लहान : ४८०, मोठे ५५० घोळ : ४८०, करली : २८०, भिंग : ३००, पाला : ७०० वाम १२००, पिवळी लहान २०० मोठे ३२०, काळी : २००, ओले बोंबील : लहान ६०, मोठे १००

कोळंबी ः लहान : २००, मोठी : ४८० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान १६०, मोठे २६०, मांदेली : ८०-१०० राणीमासा : १६०, खेकडे : १६०, चिंबोऱ्या : ३६०-४००.

खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : २००, नगली : लहान ३२० मोठी ४००, तांबोशी : ३६०, पालू : २००, लेपा : १८०-२४०, शेवटे : लहान १२० मोठे २४० बांगडा : १००-१६० ,पेडवी : ४०, बेळुंजी : १०० तिसऱ्या : १४० खुबे : १००, तारली : ८०-१००

नदीची मासळी : रहू : १००-१२०, कतला : १२०-१४०, मरळ : लहान २८० मोठी ३२०, शिवडा : १२० चिलापी : ३०, मागुर : ८०, खवली :१४० आम्ळी : ६० खेकडे : १२०, वाम : ४००.

मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ५००.चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.
अंडी : गावरान : शेकडा : ५८०, डझन : ७८ प्रति नग : ६.५. इंग्लिश : शेकडा : ३४२ डझन : ४८ प्रतिनग : ४.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...