agriculture news in marathi, Due to drought in 246 villages in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यातील २४६ गावांवर दुष्काळाचे सावट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

सांगली ः जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने पेरणी आणि पीकपाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्‍यांतील २४६ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने या गावांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

सांगली ः जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने पेरणी आणि पीकपाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्‍यांतील २४६ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने या गावांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे वेळेवर पावसाला सुरवात झाली. यामुळे बळिराजा आनंदी होता. पलूस, मिरज, कडेगाव, शिराळा या तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. यामुळे या भागातील पिके चांगलीच बहरली. मात्र, दुष्काळी पट्ट्यात उन्हाळ्यातील वादळी पडलेल्या पावसावर पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकाची पुरेशी वाढ झाली नाही.

अनेक पिके वाळून गेल्याने शेतकरी हतबल झाला. त्यामुळे प्रशासनाने पीकपाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामस्तरावरील समितीने पाहणी केली. त्यात २४६ गावांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी लागली आहे. या गावांचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. सुधारित अहवाल या महिनाअखेरपर्यंत आणि अंतिम अहवाल डिसेंबरपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा पावसाची बिकट स्थिती आहे. परतीचा पाऊसही अद्याप पुरेसा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे

प्रशासनाची सतर्कता
गेल्या वर्षीच्या खरिपात २५८ गावांत ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी लागल्याने दुष्काळसदृश स्थिती जाहीर होती. वीजबिल, शैक्षणिक शुल्कात सवलत दिली आली. त्यात आटपाडी तालुक्‍यातील एकाही गावाचा समावेश नव्हता. हा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उचलून धरल्याने ग्राम समितीकडून पीक, पाऊस याची पाहणी व्यवस्थित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी दिले.

योजना पूर्ण क्षमतेने चालवण्याची आवश्‍यकता
जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालवण्याची गरज आहे. टेंभू, ताकारी, आरफळ या योजना सुरू झाल्या असल्या, तरी म्हैसाळ योजना अद्याप सुरू झालेली नाही. सध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्रित या पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकांचे, जनावरांचे हाल होणार आहेत.

तालुका गावांची संख्या
तासगाव ६९
मिरज ३७
कवठेमहांकाळ ६०
जत ५४
आटपाडी २६

 

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...