नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

अतिपावसाचा कारखान्यांच्या गळितावर परिणाम शक्‍य
अतिपावसाचा कारखान्यांच्या गळितावर परिणाम शक्‍य

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने पाऊस नोंदीची आकडेवारी फुगत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाळीस टक्के पाऊस कमी आहे. पावसाअभावी खरिपाच्या पिकाचे सुमारे साठ ते सत्तर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सुरू असलेला पाऊसही आता थांबला आहे. यंदा नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जिरायती भागात वाढ न झालेली पिके शेतकरी मोडून काढू लागले आहेत.

नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याचा पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरण भरलेले आहे. हरिचंद्रगड, कळसूबाई शिखराच्या पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मुळा धरणात पाणी जमा झाले आहे. मात्र अकोले तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील पंचवीस गावाचा पट्टा वगळता अन्य जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागात पाऊस नाही.

मुळात पावसाळा सुरू झाला तरी अजून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात जोरदार पाऊस नाही. त्यामुळे पाणी पातळी वाढणाऱ्या, ओढा, नाला, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यात अजून कोठेही पाणी साठले नाही. जुलै, ऑगस्टच्या काळात पाणी पातळी वाढण्याचा कालावधी असतो, यंदा मात्र पाणीपातळी वाढली नाही. खरिपाची पिके जगवण्याची सध्या चिंता निर्माण झाली आहे.

यंदा खरिपाची ४ लाख ६९ हजार८७६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यात बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र असते. यंदा मात्र पावसाअभावीच केवळ पावसावर अवलंबून असलेले बाजरीचे अर्धे क्षेत्र पेरणीविना राहिले आहे. खरिपातील मुगाच्या उत्पादनात अर्धी घट झाली आहे. बाजरी, कापूस, तुरी वाढ खुंटली असल्याने त्यालाही फटका बसणार हे स्पष्ट झाले आहे. आधीच संकटावर मात सुरू असलेला दूध व्यवसाय, चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत असल्याने अडचणीत येत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी १००.२९ टक्के पाऊस झाला होता. यंदा ६०.४९ टक्के पाऊस झाला आहे. संगमनेर, श्रीरामपूरला मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. तर अन्य तालुक्‍यांत कमी पाऊस आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस (टक्के) कंसात गतवर्षी झालेला पाऊस
अकोले १०६. ३६ (१५५.५९)
संगमनेर ८७.३७ (७४.१७)
कोपरगाव ७०.२० (६८.६१)
श्रीरामपूर ८५.५५ (९०.८७)
राहुरी ५५.५३ (९१.८१)
नेवासे ४४.२३ (११३.३१)
राहाता ६२.०२ (१२१.०८)
नगर ४०.६३ (९५.९४)
शेवगाव ६०.९८ (९२.२४)
पाथर्डी ५१.२० (८२.६१)
पारनेर ५०.२२ (९७.९१)
कर्जत २७.६२ (११६.७१)
श्रीगोंदा ४४.५८ (९६.९५)
जामखेड ५९.२७ (१०१.८४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com