agriculture news in marathi, due to lack of rain october pruning was stopped, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी आॅक्टोबर छाटणी रखडली
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

सांगली : जिल्ह्यातील द्राक्षपट्ट्यात पावसाने ओढ दिली आहे. याचा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. दरवर्षी ऑगस्टपासून द्राक्षबागांच्या छाटणीला सुरवात होते. मात्र, यंदा ऑक्‍टोबर महिना सुरू झाला, तरी अद्यापही छाटणीला प्रारंभ झालेला नाही. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस वेळेत झाला नाही, तर द्राक्ष हंगाम लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

सांगली : जिल्ह्यातील द्राक्षपट्ट्यात पावसाने ओढ दिली आहे. याचा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. दरवर्षी ऑगस्टपासून द्राक्षबागांच्या छाटणीला सुरवात होते. मात्र, यंदा ऑक्‍टोबर महिना सुरू झाला, तरी अद्यापही छाटणीला प्रारंभ झालेला नाही. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस वेळेत झाला नाही, तर द्राक्ष हंगाम लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात सव्वा लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जाते. तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ, विटा, मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस बरसला. मात्र नंतर त्याचा जोर ओसरत गेला. जुलैचा उत्तरार्ध व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील तासगाव, जत, मिरज या तालुक्‍यांत पावसाने उघडीप दिली. पलूस, कडेगाव तालुक्‍यांत काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून पूर्णपणे पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील तलाव कोरडे पडले आहेत. विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यात ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. मात्र, कृष्णा नदीची पाणीपातळी कमी असल्याने या योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होत नाहीत. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झालेली नाही. त्यामुळे छाटणीला पाणी तरी कोठून आणायचे या चिंतेत द्राक्ष बागायतदार आहेत.

गेल्या वर्षी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाला होता. मात्र, या वर्षी चित्र वेगळे निर्माण झाले आहे. पाऊस नसल्याने छाटणी थांबली आहेत. परतीचा पाऊस वेळेत झाला नाही, तर टॅंकरद्वारे बागेला पाणी देऊन द्राक्ष उत्पादन घेण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. छाटणी उशिरा झाल्यास यंदाच्या हंगामात द्राक्ष हंगाम पुढे जाणार आहे.

परिमाणी एकाच वेळी द्राक्षे बाजारपेठेत दाखल होतील. यामुळे दराची स्थिती काय होईल याचा अंदाज मात्र, सध्या तरी सांगता येत नसल्याचे असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यातील भूजलपातळी खालावली आहे. द्राक्षबागेची छाटणी केल्यानंतर बागांना दररोज सरासरी दहा ते बारा हजार लिटर पाणी द्यावेच लागते. जर उष्णता जास्त असेल यात वाढ करावी लागते. द्राक्ष हंगाम संपेपर्यंत शेततळी, विहिरींमध्ये पाण्याची उपलब्धता पाहूनच छाटणी केली जाते. ठिबक सिंचन वापरूनही यंदा पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. यामुळे सप्टेंबरमध्ये छाटणी करणाऱ्या द्राक्ष उत्पादकही पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

शेततळे भरून घेण्याचे नियोजन
जिल्ह्यात काही भागांमध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग शेततळी भरून घेण्यासाठी शेतकरी करीत आहे. प्रत्येक वर्षी अनेक शेतकरी टॅंकरने पाणी आणून बागा जगवतात. मात्र, कृष्णा नदीत पाणीपातळी कमी असल्याने टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे लाभ क्षेत्रात पाणी येण्यास विलंब होत आहे. पाणी आले, की शेतकरी शेततळे भरून घेण्याचे नियोजन करू लागले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...