agriculture news in marathi, due to low rates No purchase of cotton at marketing centers | Agrowon

कमी दरामुळे पणनच्या केंद्रांवर कापूस खरेदी शून्यच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

जळगाव : खानदेशातील पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. कमी दरांमुळेच शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांकडे पाठ दाखविल्याचे चित्र आहे. दुसरीकडे एक बोंडही कापूस खरेदी न झाल्याने जे केंद्र सुरू केले त्यावर हकनाक खर्च झाला आहे.

जळगाव : खानदेशातील पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. कमी दरांमुळेच शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांकडे पाठ दाखविल्याचे चित्र आहे. दुसरीकडे एक बोंडही कापूस खरेदी न झाल्याने जे केंद्र सुरू केले त्यावर हकनाक खर्च झाला आहे.

खानदेशसह नाशिकच्या काही भागात पणन महासंघाने जळगाव विभागांतर्गत आठ खरेदी केंद्र सुरू केले. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तसेच धुळे, जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा, अमळनेर, यावल, मुक्ताईनगर येथे खरेदी केंद्र सुरू केले. परंतु यापैकी एकाही केंद्रावर कापूस आवक सुरवातीपासून झालेली नाही. हे केंद्र सुरू होऊन सुमारे अडीच महिने झाले आहेत.

या आठ केंद्रांवर कर्मचारी व इतर यंत्रणा कार्यरत आहे. यातच अलीकडे मका, तूर, कडधान्य खरेदीसंबंधी मार्केटिंग फेडरेशन शेतकी संघ व इतर संस्थांची सब एजंट म्हणून नियुक्ती करतो. अशीच सब एजंट म्हणून पणन महासंघाचीही मार्केटिंग फेडरेशन किंवा नाफेडने थेट नियुक्ती करावी.

यामुळे शेतकऱ्यांची एकाच खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही व पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग शासनाला करून घेता येईल, असे पणन संचालक संजय पवार यांनी म्हटले आहे.

कमी दरांमुळे शेतकऱ्यांची पाठ
पणन महासंघाच्या केंद्रांना मागील पाच सहा वर्षांपासून फारसा प्रतिसादच जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण मागील पाच सहा वर्षे जेवढा दर पणनच्या केंद्रात कापसाला जाहीर झाला, त्यापेक्षा अधिक दर खुल्या बाजारात मिळाला. यंदा ४३५०, ४२५० व ४१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर पणनच्या केंद्रात कापसाच्या प्रजातीसह दर्जानुसार जाहीर झाला होता. परंतु यापेक्षा अधिक दर कापूस उत्पादकांना आपल्या गावातच खेडा खरेदीद्वारे खासगी व्यापाऱ्यांकडून मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी बैलगाडी किंवा इतर वाहनातून पणनच्या केंद्रात कापूस आणला नाही, अशी माहिती मिळाली.

पणन महासंघाच्या खानदेशातील केंद्रांवर कापूस आवक झालीच नाही. आम्ही कापूस उत्पादकांना ५०० रुपये बोनस दिला जावा, अशी मागणी केली होती. परंतु, त्या मागणीचीही दखल शासनाने घेतली नाही. कमी दरांमुळे शेतकरी पणनच्या केंद्रात कापूस आणत नाहीत.

- संजय पवार, संचालक, पणन महासंघ.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...