agriculture news in marathi, due to non-production Farmers cut downpomegranate | Agrowon

अकोल्यात उत्पादनाअभावी शेतकरी तोडताहेत डाळिंबाच्या बागा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

अकोला : पारंपरिक पिकांपासून फळपिकांकडे वळालेल्या शेतकऱ्यांना डाळिंबापासून पुरेशे उत्पादन मिळत नसल्याने बागा तोडण्याची वेळ अाली अाहे. प्रामुख्याने अकोट तालुक्यात हा प्रकार अधिक वाढला असून एकट्या बोर्डी गावात वर्षभरात तीन शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा तोडल्या.

कुठलाही खर्चसुद्धा यापासून शेतकऱ्यांचा निघू शकला नाही. यामध्ये कृषी विभागाकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याचेही कारण हे शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

अकोला : पारंपरिक पिकांपासून फळपिकांकडे वळालेल्या शेतकऱ्यांना डाळिंबापासून पुरेशे उत्पादन मिळत नसल्याने बागा तोडण्याची वेळ अाली अाहे. प्रामुख्याने अकोट तालुक्यात हा प्रकार अधिक वाढला असून एकट्या बोर्डी गावात वर्षभरात तीन शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा तोडल्या.

कुठलाही खर्चसुद्धा यापासून शेतकऱ्यांचा निघू शकला नाही. यामध्ये कृषी विभागाकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याचेही कारण हे शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी बागायती शेतीचे प्रमाण अधिक अाहे. शेतकरी अाता काळानुरूप पीक पद्धती बदलण्याकडे वळत अाहेत. पारंपरिक पिकांसोबतच थोड्याफार क्षेत्रात डाळिंब, लिंबू, केळी, संत्रा अशा फळबागाही उभ्या करीत अाहेत. लागवडीसाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जाते. परंतु नंतर फारशी माहिती दिली जात नसल्याचा अारोप शेतकरी करीत अाहेत.

एकीकडे फळबाग क्षेत्र वाढावे म्हणून अनेक योजना राबविल्या जातात. नंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहिजे त्या उपाययोजनांचा जागर होताना दिसत नाही. याचाच जबर फटका डाळिंब बागायतदारांना अधिक बसला अाहे.
बोर्डी गावात तीन वर्षांपूर्वी सहा शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड केली होती.

यापैकी तिघांनी बागा तोडण्याचा निर्णय घेतला. दोन बागा पूर्णतः तोडून पारंपरिक पिके पुन्हा घेण्याकडे हे शेतकरी वळाले तर अाता रामभाऊ भालतिलक यांची बाग तोडणी सुरू अाहे.

खर्च जास्त, उत्पन्न कमी
डाळिंबाच्या बागेचे व्यवस्थापन करताना खर्च अधिक लागतो. एकरी ८० ते ९० हजारांपर्यंत खर्च होत असताना उत्पन्न ५० ते ६० हजार होते. त्यामुळे ही बाग जोपासणे तोट्याचे झाले असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. यातूनच अनिल अातकड यांनी सहा एकर, अशोक ताडे यांनी चार एकरातील बाग तोडली. अाता राम भालतिलक चार एकरांतील बाग तोडत अाहेत.

फळपीक विम्याचाही अाधार नाही
पीकविमा हा शेतकऱ्यांना मोठा अाधार असतो, असा प्रचार शासन करते. परंतु अकोला जिल्ह्यात डाळिंब पिकाला फळपीक विम्याचा लाभ दिला जात नाही. हे पीक विम्याच्या कार्यक्षेत्रात गृहीत धरले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना अापत्तीच्या काळात कुठलीही मदत मिळत नाही. 

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...