थकबाकीपोटी ‘चांदापुरी’ मालमत्ता ताब्यात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील चांदापुरी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ३० कोटी २४ लाखांच्या कर्जापोटी स्टेट बॅंकेच्या पुणे शाखेने कारखान्याच्या ३६ एकर क्षेत्रासह कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जानकर आणि राजेंद्र देवकाते यांच्या नावे असलेल्या माळशिरस वेळापुरातील तारण मालमत्तांचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. या संदर्भातील नोटिशीचे जाहीर प्रसिद्धीकरण बॅंकेने केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्‍यातील चांदापुरी हा महत्त्वाचा कारखाना मानला जातो. विशेषतः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील हा कारखाना शेतकऱ्यांच्या पुढाकारातून उभा राहिला आहे. त्यानंतर पुढे त्यातून काही नेते तयार झाले. पण आताची कारखान्याची स्थिती पाहता, कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता फार कमी राहिल्याचे बोलले जाते. स्टेट बॅंकेच्या पुणे येथील वाणिज्य शाखेतून चांदापुरी साखर कारखान्याने कर्ज घेतले होते.

३० कोटी २४ लाख १४ हजार ६०१ एवढे कर्ज आणि त्यावरील व्याज थकीत राहिल्याने ते भरण्यासाठी बॅंकेने ४ ऑक्‍टोबरला नोटीस पाठवून दिली होती. तसेच कर्ज व त्यावरील व्याजाची रक्कम ६० दिवसांच्या आत भरण्यास सांगितले होते. मुदत देऊनही त्याला कोणताच प्रतिसाद कारखान्याने दिला नाही. त्यामुळे बॅंकेने सिक्‍युरिटायझेशन कायदा कलम १३ (४) नियम अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तारण मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com