agriculture news in marathi, Due to the scarcity of water, the problem of grape crisis | Agrowon

पाणीटंचाईमुळे द्राक्षबागांसमोर संकट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सावळज, जि. सांगली : सातत्याच्या दुष्काळामुळे सावळज पूर्व भागातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. मागील व यंदाच्या पावसाळा कोरडाच गेला. त्यामुळे परिसरातील अग्रणी नदीसह, बंधारे, लघू-मध्यम तलाव कोरडे राहिले. पर्जन्यअभावी शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअर कोरड्या पडल्या आहेत. 

सावळज, जि. सांगली : सातत्याच्या दुष्काळामुळे सावळज पूर्व भागातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. मागील व यंदाच्या पावसाळा कोरडाच गेला. त्यामुळे परिसरातील अग्रणी नदीसह, बंधारे, लघू-मध्यम तलाव कोरडे राहिले. पर्जन्यअभावी शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअर कोरड्या पडल्या आहेत. 

सावळज परिसरात ऐन हंगामात फळधारणा झालेल्या बागांना पाणी कमी पडत आहे. त्यामुळे टॅंकरने विकतचे पाणी देऊन बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पूर्व भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तंभ म्हणून द्राक्षबागांना ओळखल्या जातात. हाच स्तंभ पर्जन्याअभाव व बंद पाणी योजनामुळे मोडकळीस आला आहे. शिवाय अवेळी भारनियमन, ढगाळ, थंड वातावरण, रोगराई असे अस्मानी-सुलतानी संकटे आहेत. कर्जाचा बोजा डोक्‍यावर घेऊन जिद्दीने बागा फळपिकास आणणाऱ्या शेतकऱ्यांचा मूलभूत पाणीप्रश्न कधी सुटणार..? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अल्प पाण्यावर प्रयोगात्मक बागा करीत साता समुद्रापार द्राक्षाचे नाव करणाऱ्या शेतकऱ्यांना तटपुंज्या शासकीय मदतीची अपेक्षा नसून, मुबलक पाणी देण्याची गरज आहे. 

शेतकरी पुन्हा कर्जबाजारी 
बहुतांश शेतकऱ्यांनी बागासाठी लाखो रुपये कर्ज काढली आहेत. पाणीटंचाईची दाहकता पाहता सध्याचा हंगाम व येणारा उन्हाळा शेतकऱ्यांना मरणयातना देणार हे निश्‍चित आहे. भीषण पाणीटंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रतिवर्षी विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने अनेकांनी बागा काढून टाकल्या आहेत. पाणी व रोगराईच्या वाढत्या संकटांनी शेतकरी हतबल आहे.

इतर बातम्या
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
सांगलीत पन्नास कोटींच्या पीककर्ज वसुलीस...सांगली : दुष्काळामुळे जिल्ह्यातील २१ हजार १४९...
सोलापूर जिल्ह्यात चार पाणीपुरवठा...सोलापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन...
आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी न...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाखाली असलेल्या...
गोंदिया जिल्ह्यात ‘जलयुक्‍त’साठी १४...गोंदिया ः राज्य दुष्काळमुक्‍त करण्याच्या...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...