मोर्शी तालुक्‍यात ५० कोटी खर्चूनही दुष्काळस्थिती कायम

मोर्शी तालुक्‍यात ५० कोटी खर्चूनही दुष्काळस्थिती कायम
मोर्शी तालुक्‍यात ५० कोटी खर्चूनही दुष्काळस्थिती कायम

अमरावती ः संत्रा लागवडीमुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या मोर्शी तालुक्‍यात जलयुक्‍त शिवारात ५० कोटींची कामे झाली. परंतु, त्यानंतरही या तालुक्‍याच्या माथी असलेला ड्रायझोनचा कलंक आणि दुष्काळीस्थिती कायम असल्याने हा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे. 

वरुड, मोर्शी तालुक्‍यांत संत्रा लागवड सर्वाधिक आहे. या भागात पाणीउपसा झाल्याने हे दोन्ही तालुके ड्रायझोन घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात बोअरवेलवरदेखील बंदी लादण्यात आली. यातील मोर्शी तालुक्‍यात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांशी उपक्रम असलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. २०१५ ते २०१८ या तीन आर्थिक वर्षात ८३ गावे अभियानात समावेशीत होती. या ८३ गावांमध्ये २१४२ कामांना मान्यता देण्यात आली. यापैकी २१२२ कामे पूर्ण करण्यात आली. संपूर्ण ८३ गावे जलपरिपूर्ण झाली. त्यावर ४४ कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे.  २०१८-१९ या आर्थिक वर्षात तालुक्‍यातील २५ गावे निवडत त्यातील २५६ कामांना मान्यता देण्यात आली. ४ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता यासाठी दिली गेली. यानुसार मागील चार वर्षांत सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी जलयुक्‍त अभियानात खर्ची घालण्यात आला. ड्रायझोनच्या परिस्थितीत सुधारणा तर दूरच यावर्षी तालुक्‍यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी जलयुक्‍तचा निधी अधिकाऱ्यांनी मुरविल्याचा आरोपदेखील यापार्श्‍वभूमीवर केला जात आहे. २०१७-१८ मध्ये तालुक्‍यातील ६४ गावांमध्ये नाला सरळीकरण व खोलीकरणावर ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले. जीएसडीएद्वारे रिचार्ज शिफ्टकरिता १२ गावांमध्ये १२० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर सुमारे ३७ लाख रुपयांचा खर्च झाला. रोजगार हमी योजनेअंतर्गत ८६९ सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा अधिकारी करतात. मग तालुक्‍यातील ५० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्‍यात बोअरवेलवर बंदी असतानाही त्या अनधिकृतपणे खोदल्या जात आहेत. ८०० ते १२०० फुटापर्यंत बोअर घेतल्या जातात. त्याचाही परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. 

धरण उशाशी तालुका मात्र ड्रायझोनमध्ये  वॉटरकप स्पर्धाही याच तालुक्‍यात घेण्यावर भर देण्यात आला. उशाशी अप्पर वर्धा धरण असतानाही तालुक्‍याच्या माथी असलेला ड्रायझोनचा कलंक तसाच आहे. तालुक्‍यात यापूर्वी कोल्हापूरी बंधारे व शेकडो सिमेंट प्लग घेण्यात आले. परंतु, दुरुस्तीअभावी ते अंतिम घटका मोजत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com