agriculture news in marathi, Due to water conservation, the state will be drought-free | Agrowon

‘जलयुक्त’मुळे राज्य दुष्काळमुक्त होणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जानेवारी 2018

मुंबई  : गेल्या तीन वर्षांत राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी, तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून, या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून, या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली, तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई  : गेल्या तीन वर्षांत राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी, तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून, या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून, या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली, तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

२०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ती, संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ४) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या त्यांच्या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सांगितलेल्या उपायातूनच जलसंधारणाची ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली.

राज्य स्तरावरील महात्मा जोतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार - मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर), द्वितीय क्रमांक - वेळू (ता. कोरेगाव, जि. सातारा), कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना; तर राज्य स्तरावरील तालुका संवर्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यास प्रथम, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यास द्वितीय, तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड जिल्ह्यास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

सामुदायिक, अशासकीय संस्थांमध्ये प्रथम पुरस्कार - संस्कृती संवर्धन मंडळ (सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड), द्वितीय पुरस्कार - आर्ट ऑफ लिव्हिंग सेवाभावी संस्था (जालना) यांना देण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार - संजय ज्ञानोबा शिंदे (नेकनूर, ता. जि. बीड), द्वितीय पुरस्कार - सुभाष उत्तमराव नानवटे (रा. दोडकी, ता. जि. वाशीम) यांना प्रदान करण्यात आला.

पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार - अविनाश अंकुशराव कदम (पुण्यनगरी, पुणे); द्वितीय पुरस्कार - संदीप दत्तू नवले (ॲग्रोवन, अहमदनगर),  तृतीय पुरस्कार - संगीता हनुमंतराव भापकर (दै. सकाळ) यांना, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रथम पुरस्कार रवींद्र शिवाजी कांबळे (सांगली), द्वितीय पुरस्कार - शशांक रमेश चवरे (अमरावती), तृतीय पुरस्कार - शशिकांत पाटील (लातूर) यांना देण्यात आला.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘कर्जनिधी’चा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार...केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज म्हणून ११ लाख...
अधिक नुकसान, कमी भरपाईराज्यभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही...
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
तेहेतीस वर्षांपासून ‘बोन्साय’ कलेचा...पुणे येथील प्राजक्ता काळे यांनी ३३ वर्षांपासून...
उसापेक्षा किफातशीर ठरले रताळेसोलापूर जिल्ह्यातील बाभूळगावाने रताळे पिकात आपली...
हमी नको, हवा रास्त भाव केंद्र सरकारने २०१८ चा अर्थसंकल्प सादर करताना...
राज्यात अधिकाधिक ‘सीड पार्क’...दर्जेदार बियाण्यांच्या संशोधनासाठी खासगी...
दीडपट हमीभाव : केंद्र सरकारचं लबाडाघरचं...केंद्र सरकार आकड्यांचा खेळ करून स्वतःच्या सोयीचा...
उत्पादन खर्च काढण्यात सरकारची चलाखीपुणे : केंद्र सरकार आपल्या सोयीचा उत्पादन...