agriculture news in marathi, due to water scarcity the area of summer crops decreased,varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात पाणीटंचाईमुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018
गेल्या तीन हंगामांपासून उन्हाळी भुईमूग पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. या पिकातून लागवड खर्चही निघाला नव्हता. त्यामुळे यावर्षी लागवड क्षेत्र घटविले आहे. 
- बंडू पाटील, राहेर, ता. पातूर, जि. अकाेला.
अकोला ः उन्हाळ्यात हमखास उत्पन्न मिळवून देणारी भुईमूग, टरबूज, भाजीपाला ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची उपलब्धता नसल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. तीनही जिल्ह्यांमध्ये पाणी समस्येमुळे उन्हाळी पिकांची लागवड घटली आहे. उन्हाळ्यात वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा हजार हेक्‍टरपर्यंत भुईमूग, भाजीपाला, टरबूज पिकांची लागवड होते. या हंगामात हे क्षेत्र पाच ते सहा हजार हेक्‍टरपर्यंत खाली आले असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.    
 
या वर्षात तिनही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. जेवढा पाऊस पडला तो खंड स्वरूपात तसेच अनियमित होता. परिणामी नदी-नाले वाहिले नाहीत. प्रकल्पही कोरडेच राहिले. यामुळे भूजल पातळीतसुद्धा घट झाली आहे. प्रकल्पावर आधारित असलेल्या उन्हाळी पिकांच्या सिंचनावर परिणाम झाला आहे. तसेच विहिरींवर आधारित सिंचनातही घट झाली.
 
अकोला जिल्ह्यात उन्हाळ्यात प्रामुख्याने भुईमुगाची लागवड होते. तेल्हारा, अकोट, पातूर, बार्शिटाकळी या तालुक्‍यांमधील शेतकरी या पिकाला प्राधान्य देत असतात. मागील हंगामात भुईमुगाचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी फारशी लागवड केलेली नाही. 
 
सध्या जी लागवड झाली त्या भुईमुगाच्या क्षेत्रावर प्रामुख्याने रिसोड तालुक्‍यात काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी आता उपाययोजना करण्यात व्यस्त झाले आहेत. भाजीपाल्याच्या लागवडीलासुद्धा पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. टरबुजाचीसुद्धा तितकीशी लागवड झालेली नाही. या दुष्काळी परिस्थितीचा थेट फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो आहे. 
 
हंगामात ज्वारी व इतर चारावर्गीय पिकांची लागवड कमी होती. उन्हाळ्यात काही शेतकरी चाऱ्याची पिके घेऊन तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी पाणी कमी झाल्याने ही पिके घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. याची झळ पशुपालकांना बसू शकते. हिरवा चाऱ्याचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...