agriculture news in marathi, During the monsoon dam dry | Agrowon

सांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

सांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. साठवण क्षमतेच्या जेमतेम चार टक्‍के मृतसंचय पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे.

सांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. साठवण क्षमतेच्या जेमतेम चार टक्‍के मृतसंचय पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे.

तालुक्‍यात १४ ल. पा. तलाव आहेत. पैकी दहा तलावांत टेंभूचे पाणी आले आहे. हे सर्व तलावांतील पाण्याने मृतसंचय पातळी तळ गाठला आहे. बहुतांश तलाव कोरडे पडण्यात जमा आहेत. या पाण्याचा पिण्यासाठी पाणीपुरवठा करता येत नाही. यात आटपाडी तलावावर आटपाडी, मापटेमळा, माडगुळे, कचरेवस्ती तलावावर तडवळे- बनपुरी, पाच गावची शेटफळे प्रादेशिक आणि मिटकी, घाणंदवर खरसुंडी, घरनिकी, वलवण आणि घाणंद योजना, जांभूळणी तलावावर पडळकरवाडी आणि पारेकरवाडी योजना, निंबवडेवर निंबवडे, गळवेवाडी, पुजारवाडी, माळेवस्ती तलावावर नेलकरंजी, अर्जुनवाडी तलावावर गोमेवाडी, कानकात्रेवाडी आणि बाळेवाडी योजना आणि झरे तलावावर झरे योजना अवलंबून आहेत. या तलावातील पाण्याने १ लाख २९ हजार लोकांची तहान भागविली जाते.

टॅंकरची मागणी केलेली गावे
विभूतवाडी, कुरूंदवाडी, मुढेवाडी, तडवळे, पिंपरी ब्रुदुक, पुजारवाडी (दि), झरे, विठलापूर, आंबेवाडी.

उपसा बंदीला केराची टोपली
पिण्याचा पाणीपुरवठा तलाव कोरडे पडत असताना महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली. राखीव पाणीसाठा पातळी झाल्यावर उपसा बंदी लागू करण्याची आणि मोटारीचे कनेक्‍शन तोडण्याच्या कारवाईची गरज होती. ती केली नसल्यामुळे आज भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

तलाव क्षमता (द.ल.घ.फू.) सध्याचा साठा (द.ल.घ.फू.)
आटपाडी ३०८.९७ ४.००
कचरेवस्ती ११०.४० ३.००
जांभूळणी १०९.२० कोरडा
घाणंद ५०.९३ ८.००
निंबवडे २३५.१५ १.५०
शेटफळे ५१.९३ कोरडा
माळेवस्ती ६६.३० १५.००
अर्जुनवाडी ८३.२१ ३.००
बनपुरी ४७.४९ ५.००
झरे १.०० -
एकूण १२८०.२२ ४०.००

 

इतर बातम्या
बुलडाण्यात चारा छावणी उघडण्यास मुहूर्त...बुलडाणाः जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत...
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या...
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची...जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या...
लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर...रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू...
कसणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास...विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची...
सांगली : सव्वातीन लाख हेक्‍टरवर खरीप...सांगली : यंदा वळवाच्या पावसाने दडी मारली....
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणाजळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील...
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन चार...नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांची चारा...
सुला विनियार्ड्समध्ये ९ हजार टन...नाशिक : देशातील आघाडीच्या वाइन उत्पादक असलेल्या...
जत तालुक्यातील दीड हजार शेततळी कोरडीसांगली :  शासनाच्या योजनेतून जत तालुक्यात...
परभणीत मंगळवारपर्यंत उष्णतेची लाटपरभणी : भारतीय हवामान विभागातर्फे जिल्ह्यात...
`उर्ध्व पेनगंगाचे पाणी सोडा`नांदेड : मालेगाव (ता. अर्धापूर) परिसरातील...
सोलापूर विद्यापीठाकडून वनस्पतींची...सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
बुरशी, जिवाणू, सूत्रकृमीमुळेच आले...औरंगाबाद: जिल्ह्यातील आले पिकाचे २०१५-१६ व २०१८-...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...