agriculture news in Marathi, dynamic cash credit compulsory for e-nam, Maharashtra | Agrowon

ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-नाम) शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी खरेदीदारांना डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी बॅंकर्सची बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी कॅश क्रेडिटची साेय खरेदीदारांना उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-नाम) शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी खरेदीदारांना डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी बॅंकर्सची बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी कॅश क्रेडिटची साेय खरेदीदारांना उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

राज्यात दाेन टप्प्यांमध्ये ४५ बाजार समित्यांमध्ये ई-नाम राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. ई-नाममध्ये खरेदीदारांची क्षमता बघूनच त्याला खरेदीमध्ये उतरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी त्याची नाेंदणी पणन संचालनालयाकडे करण्यात येणार असून, खरेदीदाराला कॅश क्रेडिट एवढाच शेतमाल खरेदी करण्यात येणार आहे.

सध्या कॅश क्रेडिटपेक्षा अधिक रकमेची खरेदी केली जाते. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याचा धाेका संभवत असल्याने शेतकऱ्यंची फसवणूक टाळण्यासाठी आणि खरेदी विक्री व्यवहारातील पैसे तातडीने मिळण्यासाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट देण्यात येणार आहे. 

यासाठी राज्यातील विविध बॅकर्सची बैठक नुकतीच पणन संचालनालयाच्या वतीने मुंबईत घेण्यात आली. या बैठकीला पणन संचालक डॉ. अानंद जाेगदंड यांच्यासह सहकार आणि पणन विभागातील अधिकारी उपस्थित हाेते.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...