agriculture news in marathi, e-nam | Agrowon

नियमांमधील बदलांनंतर ई-नाम होणार प्रभावी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे : आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम)च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी पणन नियमांमध्ये विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. या सुधारणांचा प्रस्ताव पणन संचालनालयाद्वारे शासनाला पाठविण्यात आला असून, नियमांमधील बदलांनंतर ई-नाम याेजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्‍वास पणन संचालनालयाकडून व्यक्त हाेत आहे.

पुणे : आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम)च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी पणन नियमांमध्ये विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. या सुधारणांचा प्रस्ताव पणन संचालनालयाद्वारे शासनाला पाठविण्यात आला असून, नियमांमधील बदलांनंतर ई-नाम याेजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्‍वास पणन संचालनालयाकडून व्यक्त हाेत आहे.

ई-नाममध्ये दाेन टप्प्यांत राज्यातील ६० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील ४८ बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले असून, अधिक प्रभावीपणे राबविली जात नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. यासाठी पणनच्या नियमांमध्ये बदल पणन संचालनालयाकडून सुचविण्यात आले आहेत.

यामध्ये ई-नाम प्रक्रियेमध्ये सहभागी हाेणाऱ्या व्यापाऱ्यांना आता परवान्यांएेवजी नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. केवळ एकाच बाजार समितीमध्ये खरेदी करणाऱ्या व्यापारी, खरेदीदारांना त्याच बाजार समितीमध्ये नाेंदणी करावी लागणार आहे. तर एकापेक्षा अधिक बाजार समित्यांमधून खरेदी करावयाची असल्यास अशा व्यापाऱ्यांना पणन संचालनालयाकडे नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच खरेदीदारांना बॅंक गॅरंटीदेखील द्यावी लागणार असून, ही गॅरंटी डायनॅमिक कॅश आॅर्डरप्रमाणे असणार आहे. या कॅश क्रेडिटच्या प्रणालीमुळे जेवढ्या किमतीचा शेतमाल खरेदी केली आहे. तेवढे पैसे बॅंक गॅरंटीमधून वजा हाेणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रकमेचा शेतमाल खरेदी करून नंतर हाेणारी संभाव्य फसवणूक टाळता येणार आहे.

ई-नामद्वारे हाेणाऱ्या लिलावांमध्ये अधिक सुसूत्राता आणत शेतकरी आणि खरेदीदारांना ही प्रणाली साेपी व्हावी, यासाठी विविध नियमावली करण्यात येत आहेत. यासाठी पणन नियमांमध्ये बदल सुचविले असून, ते शासनाला सादर करण्यात आले आहेत. या बदलांना लवकरच मान्यता मिळून योजना प्रभावीपणे राबविली जाईल.
- डॉ. अानंद जाेगदंड, पणन संचालक

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...