agriculture news in marathi, 'E-name' in 9 market committees of Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

``राज्य शासनाने पणन मंडळाच्या माध्यमातून बाजार समित्यांमध्ये सुरू केलेली ई-नाम सेवा शेतकरी, बाजार समित्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला रास्त भाव, योग्यवेळी खात्यात पेमेंट उपलब्ध होणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचे प्रभोधन करण्यात येणार आहे.``

- सुनील पवार, संचालक, पणन मंडळ

नाशिक  : शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कुठेही विक्री करता यावा, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ऑनलाइन नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट अर्थात ई-नाम सेवा केंद्र महाराष्ट्र शासनाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १४५ बाजार समित्यांमध्ये ही सेवा देणार येणार असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. कळवण, देवळा, उमराणे, सटाणा, मनमाड, नांदगाव, सिन्नर, नामपूर, घोटी या बाजार समित्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतमालास अधिक दर व शेतकऱ्यांना रोख ऑनलाइन पेमेंट मिळावे म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) ही योजना आणली. या योजनेद्वारे प्रचलित बाजार व्यवस्थेतील शेतकऱ्यांची अनेक मार्गाने होणारी लूट थांबविणे हा हेतू आहे. ‘ई -नामअंतर्गत देशभरातील प्रमुख बाजार समित्या जोडल्या जात आहेत.

महाराष्ट्रातील ८५ बाजार समित्यांमध्ये ई लिलाव सुरू झाला असून, इतर १४५ बाजार समित्यांदेखील ई -नाम पोर्टलशी जोडण्याच्या योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना चिथावणीचेही प्रकार होतात. व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. याला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्याला राज्यातील शेतमालाचे भाव कळण्यासाठी; तसेच शेतमाल विक्री करताना लागणारा वेळ व श्रम वाचवण्यास मदत होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील ९ ठिकाणी ई - लिलाव यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. ई-नाम योजना एप्रिल २०१६ पासून कार्यान्वित असून, राज्यातील ५८५ बाजार समित्या ई-नामला जोडण्याचे उद्दिष्ट मार्च पर्यंत पूर्ण झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...