agriculture news in marathi, e-paus machines problem in Jalgaon | Agrowon

ई-पॉस मशिनमधून खतसाठा होतोय गायब
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यात ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनसंबंधीचा गोंधळ कायम असून, मशिनमध्ये नोंदवूनही शिलकी खतसाठा न दिसणे, मशिन चार्जिंग न होणे आदी समस्या खत विक्रेत्यांसमोर आहेत. यातच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) कंपनीची जवळपास १५ नादुरुस्त ई-पॉस मशिन खत विक्रेत्यांनी कृषी विभागाकडे जमा केली आहेत.

जळगाव : जिल्ह्यात ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनसंबंधीचा गोंधळ कायम असून, मशिनमध्ये नोंदवूनही शिलकी खतसाठा न दिसणे, मशिन चार्जिंग न होणे आदी समस्या खत विक्रेत्यांसमोर आहेत. यातच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) कंपनीची जवळपास १५ नादुरुस्त ई-पॉस मशिन खत विक्रेत्यांनी कृषी विभागाकडे जमा केली आहेत.
जिल्ह्यात ई-पॉसचे १०० टक्के काम झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पहिल्या टप्प्यात जवळपास ११०० मशिन कार्यरत झाली आहेत. या मशिनच्या माध्यमातून शिलकी खतसाठा, रिप्लाय (माहितीसंबंधीचे प्रतिसाद), अशी कार्यवाही यशस्वी झाली. त्याच्या नोंदी केंद्र सरकारच्या एमएफएमएस (मोबाईल फर्टिलायझर मॉनेटरिंग सिस्टिम) या संकेतस्थळावर झाल्या.

परंतु मागील आठ ते १० दिवसांपासून काही खत विक्रेत्यांना खतपुरवठा झाल्यानंतर त्याची ई-पॉसमध्ये नोंद करूनही दुसऱ्या दिवशी संबंधित खताचा साठा दिसत नाही. हा खतसाठा ई-पॉसमध्ये दिसत नाही म्हणून दुकानात संबंधित खत असूनही त्याची विक्री करता येत नाही. विक्री केली, तर कच्ची पावती द्यावी लागते आणि कच्ची पावती देऊ नका, असे आदेश शासनाचे आहेत. हे आदेश धुडकावले तर कारवाईचा बडगा उगारला जातो. ई-पॉसच्या सदोष यंत्रणेमुळे खतविक्रेते त्रस्त असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

तीन कंपन्यांचे सॉफ्टवेअर
ई-पॉस मशिनसंबंधीचे सॉफ्टवेअर तीन कंपन्यांचे आहे. ते परदेशातून आयात केले असून, यातील दोन कंपन्यांची मशिन व्यवस्थित कार्यरत आहेत. परंतु एका कंपनीचे मशिनचे सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करीत नाहीत, अशी माहिती मिळाली.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सने जिल्ह्यात एक हजार ई-पॉस मशिनचा पुरवठा केला. यात एका कंपनीने पुरवठा केलेल्या मशिनसंबंधी तांत्रिक अडचणी येत आहेत. मध्यंतरी खतसाठा मशिनमध्ये न दिसण्याच्या अडचणीही होत्या. पण ती बॅकअपसंबंधीची समस्या आहे. ती एक दोन दिवसांत दूर होते.
- योगेश वेंगुर्लेकर, जिल्हा व्यवस्थापक, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स

ई-पॉससंबंधी जिल्ह्यात १०० टक्के काम झाले आहे. ११०० मशिन काम करीत आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यात मशिन चार्जिंग न होणे, त्याचे सॉकेट नादुरुस्त होणे आदींचा समावेश आहे. तशी काही मशिन कृषी विभागाकडे खत विक्रेत्यांनी जमा केली. पण या अडचणी दूर केल्या जात आहेत.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...