नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'

महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. महिलांना हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल. - रोहिणी नायडू, अध्यक्ष, हिरकणी संस्था.
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'

नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी संस्थेद्वारे विविध क्षेत्रांतील १३ महिला एकत्र आल्या आहेत. शहरामध्ये महिलांसाठी पर्यावरणपूरक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरण संतुलनासाठी हातभार लागावा, यासाठी हिरकणी संस्थेतर्फे 'ई - पिंक रिक्षा' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ही रिक्षा रस्त्यावर धावणार अाहे, अशी घोषणा हिरकणी संस्थेतर्फे करण्यात आली. 

दिल्ली शहरात वायूप्रदूषण अधिक असल्याने इलेक्ट्रॉनिक रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. याच धर्तीवर नाशिक येथील पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यामध्ये जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. रोजगारनिर्मिती व पर्यावरण संवर्धनाची सांगड 'ई-पिंक रिक्षा' या प्रकल्पातून घातली गेली आहे. या माध्यमातून महिला या ''ई- रिक्षा'' चालविणार आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसायाला फाटा देत चालक क्षेत्रात संस्थेने पाऊल टाकले आहे. 

या उपक्रमाबाबत संस्थेने शहरातील विविध बचत गटांशी प्राथमिक चर्चा केली. त्यास अनेकांचा होकार मिळाला. पायलट प्रोजेक्ट म्हणून याकडे बघितले जात असून २५ महिलांनी याकरिता नोंदणी केली. त्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  शहरात अगोदरपासून अनेकजणांचा रिक्षावर उदरनिर्वाह आहे. त्यांना या कामात अडचण येऊ नये, यासाठी रिक्षा स्थानकावर या नवीन रिक्षा लावण्याची परवानगी मिळावी, याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांशी चर्चा करण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे फक्त महिलांची वाहतूक केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com