ई-पॉस चांगले; अडचणी कायम

ई-पॉस चांगले; अडचणी कायम
ई-पॉस चांगले; अडचणी कायम

पुणे : रासायनिक खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ई-पॉस (पॉईंट आॅफ सेल) मशीनचा वापर अनिवार्य करण्यात अालेला अाहे. पॉस मशिनद्वारे शासनाचे अनुदान थेट कंपनीला मिळणार असून खरेदीच्या नोंदी आधार कार्डशी संलग्न होणार आहेत. परिणामी रासायनिक खतांचा होणारा गैरव्यवहार बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय या प्रणालीमुळे अनुदानित खतांचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यावरही मर्यादा येईल. सोबतच दुसऱ्या व्यक्तीच्या नावे पावती करून परस्पर खतांची विक्री करण्यावरही नियंत्रण येणार आहे. मात्र, काही ठिकाणी सर्व्हर डाउन, नेटकनेक्टीव्हीटीचा अभाव आदी समस्या येत असल्यामुळे ‘पॉस’ मशिनद्वारे खतविक्रीत अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.

अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ई-पॉस मशिनचे मार्गदर्शन करण्यात येत आहे; पण अजूनही या मशिनद्वारे प्रभावीपणे कामकाज सुरू नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांबरोबर खत विक्रेत्यांना अद्याप अनेक त्रुटींचा सामना करावा लागत आहे. शासनाने सर्वांना पुरेशी मशिन उपलब्ध करून देऊनच हा निर्णय सक्तीचा करण्याची गरज होती; परंतु अनेक विक्रेत्यांना हे मशिनच उपलब्ध झालेले नसल्याची माहिती आहे.

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे १३१७ मशिन रासायनिक खते विक्री करण्यासाठी कार्यान्वित झाल्या अाहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती केली जात असतानाही अद्याप अनेकांना व्यवहार करताना अडचणी येत अाहेत. सर्वाधिक ७२२ मशिन बुलडाणा तर ३०४ मशिन अकोला अाणि २८८ मशीन वाशीम जिल्ह्यात वाटप झाल्या अाहेत.

पुणे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना ८६३ ‘पॉस’ मशिनचे वाटप करण्यात आले आहे. तरीही जिल्ह्यात १३१ ‘पॉस’ मशिनचा तुटवडा आहे. त्यामुळे विक्रेत्यांना हे मशिन लवकर द्यावे, अशी मागणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यात ९२४ ‘पॉस’ मशिनचे वाटप केले आहे, पण त्यापैकी सध्या ९०० मशिन कार्यरत आहेत. त्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी २४ मशिन कार्यरत झालेल्या नाहीत. त्याही लवकरच कार्यरत होतील.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रासायनिक खत विक्रेत्यांना पुरवठा करण्यात आलेल्या पीओएस मशिन पैकी १,१७८ ‘पॉस’ मशिन कार्यरत झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ७४७ मशिन उपलब्ध झाल्या आहेत. अद्यापही ९०० मशिनची गरज आहे.

अशा आहेत समस्या

  • ग्रामीण भागातील खत विक्रेत्यांकडे नेट कनेक्टीव्हिटी मिळत नाही, तसेच सर्व्हरदेखील डाउन राहत आहे.
  • काही मशिनद्वारे प्रिंटेड पावती निघत नाही; परंतु विक्री केलेल्या खताची आॅनलाइन नोंद होत आहे.
  • ‘पॉस’द्वारे खत विक्री सुरू केल्यास सर्व्हरवर ताण येऊ शकतो. त्यामुळे त्याची क्षमता वाढवावी लागणार आहे.
  • विक्रेत्यांना एकापेक्षा जास्त पीओएस मशिन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
  • ही प्रणाली सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या मशिनचे जिल्हा स्तरावरून वाटप केले गेले. या वाटपासाठी अालेल्या काही मशिन अाधीच बंद होत्या.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com