कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता शिगेला

कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता शिगेला
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता शिगेला

सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांना मदत करणारे, असे एकूण असे सव्वादोन हजारहून अधिक कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत समाविष्ट असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. कोल्हापुरात लोकसभेच्या दोन मतदारसंघांसाठी आज मतमोजणी होणार असून, सकाळी आठ वाजल्यापासून त्यास प्रारंभ होणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणीसाठीची सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

मतमोजणी गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता मिरज येथील शासकीय धान्य गोदामात सुरू होईल. बुधवारी (ता. २२) दुपारी मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. या वेळी मतमोजणी दरम्यान, येणाऱ्या अडचणीवर कशी मात करावी, याची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली. 

मतमोजणीच्या वेळी शासकीय अधिकारी-कर्मचारी, निवडणूक निरीक्षक, पुरवठादार, उमेदवार व त्यांच्याकडून नियुक्त प्रतिनिधींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सांगली-मिरज रस्त्याच्या शेजारील होंडा शोरूमजवळ वाहने थांबवण्याची व्यवस्था आहे. मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त आहे.  दुपारी चारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. 

प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, पोलिस, माध्यम प्रतिनिधी, उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींना सुरक्षेचे तीन टप्पे पार करावे लागणार आहेत. प्रवेशद्वारासमोर राज्य पोलिस, प्रवेशद्वारानंतर राखीव पोलिस दल, प्रत्यक्ष मतमोजणी केंद्राबाहेर केंद्रीय पोलिस दल तैनात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सर्व हालचालींवर नजर राहील.  

कोल्हापूर, हातकणंगलेत यंत्रणा सज्ज 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, रमणमळा परिसर, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे; तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदाम, राजाराम तलावानजीक, सरनोबतवाडी, कोल्हापूर येथे होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ११६०, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी १०४४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. मतमोजणी केंद्र व परिसरात पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय पोलिस दल यांच्यामार्फत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणी निकालाची सार्वजनिक घोषणा व एलईडी स्क्रीनवर मेरी वेदर मैदान, होमगार्ड कार्यालयाशेजारी, कसबा बावडा रोड, पितळी गणपती मंदिर,  विभागीय कृषी संशोधन केंद्र, रेणुका मंदिर चौक, या ठिकाणी प्रदर्शित करण्याची सोय केली आहे.

रत्नागिरी, रायगडची आज मतमोजणी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आज (ता. २३) सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. रत्नागिरीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा टेबल मोजणीसाठी लावण्यात येणार आहेत. सरासरी २० ते २५ फेऱ्या अपेक्षित आहेत. त्यानंतर होणाऱ्या व्हीव्हीपॅटमधील मोजणीनंतर अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे.

मतमोजणीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा पथक नेमले आहे. मोजणीसाठी ४१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोस्टल बॅलेट ४,०३९ असून ६१७ सैनिक मतदार आहेत. आतापर्यंत दोन प्रशिक्षणे झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी होणार आहे. सुविधा अ‍ॅपद्वारे मोजणीची माहिती प्रत्येक फेरीनंतर दिली जाणार आहे. कुडाळसारख्या लहान मतदारसंघाचे वीस आणि रत्नागिरीच्या २५ फेऱ्या होतील.

डॉ. मुंढे म्हणाले, ‘‘एमआयडीसी रत्नागिरीतील एफसीआय गोडावूनजवळ मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाकडून बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पक्षनिहाय कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची, वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे. गोडावूनमध्ये प्रवेशद्वार क्रमांक गेट क्र. १ व २ मधून प्रवेशासाठी आहे. दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वार (गेट नं. १) मतमोजणी अधिकारी व कर्मचारी तसेच उमेदवार यांना प्रवेश दिला जाईल. तिथे अधिकृत पासधारक व्यक्तीनांच प्रवेश असेल. सुरक्षेसाठी दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक, ४१० कर्मचारी, पोलिसांच्या एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी एक प्लाटून या ठिकाणी नियुक्त केल्या आहेत.``  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com