agriculture news in marathi, eaknath dawle says farm will become a extension model, nagpur, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांचे शिवारच व्हावे कृषीविस्ताराचे मॉडेल ः डवले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

नागपूर ः कृषी विद्यापीठाच्या शेतातच दाखविण्यापुरते तंत्रज्ञान मर्यादित असल्याने शेतकरी त्यावर पुरेसा विश्‍वास ठेवत नाहीत. त्याकरिता उपलब्ध तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत नेत त्याआधारे मॉडेल विकसित झाले तरच कृषीविस्ताराचा खरा उद्देश साध्य होईल. अशाप्रकारची कृषी विस्ताराची संकल्पना राबविण्यावर येत्या काळात भर दिला जाणार असल्याची माहिती प्रभारी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.

नागपूर ः कृषी विद्यापीठाच्या शेतातच दाखविण्यापुरते तंत्रज्ञान मर्यादित असल्याने शेतकरी त्यावर पुरेसा विश्‍वास ठेवत नाहीत. त्याकरिता उपलब्ध तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत नेत त्याआधारे मॉडेल विकसित झाले तरच कृषीविस्ताराचा खरा उद्देश साध्य होईल. अशाप्रकारची कृषी विस्ताराची संकल्पना राबविण्यावर येत्या काळात भर दिला जाणार असल्याची माहिती प्रभारी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.

जलसंधारण विभागाचे सचिव असलेल्या एकनाथ डवले यांच्याकडे कृषी खात्याच्या अपर सचिव पदाचा प्रभार देण्यात आला आहे. श्री. डवले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कृषी विस्तारांच्या संकल्पनांमध्ये बदल करण्याची गरज मांडली.

ते म्हणाले, की राज्यात कृषी विद्यापीठाद्वारे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान तसेच वाण विकसित केले जातात. परंतु, वाणाचे प्रात्याक्षिक आणि नवीन अवजारांचे सादरीकरण केवळ विद्यापीठ प्रक्षेत्रापुरतेच मर्यादित राहते. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहिती व्हावे, याकरिता कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यास दौरे आयोजित होतात. परंतु, अशा अभ्यास दौऱ्यातून कृषीविस्ताराचा उद्देश साध्य होत नाही. एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या शेतात पाहिल्याशिवाय शेतकरी अशा तंत्रज्ञानावर विश्‍वास ठेवत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वापरावर मर्यादा आल्या आहेत.

कृषीविस्ताराला गती देण्याकरिता सद्याच्या प्रचलीत पद्धतीत बदलाची गरज आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतावर तंत्रज्ञानाचे मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याचे प्रस्तावीत आहे. अशाप्रकारचे मॉडेल मग कृषी विस्ताराच्या उद्देशाने अभ्यास दौऱ्याअंतर्गत दाखविले जातील. अकोल्यातील जय गजानन शेतकरी मंडळाने कापूस शेती यांत्रिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प कृषी विस्ताराला गती देणारा आहे. अशाप्रकारचे मॉडेल विकसित होण्याची गरज श्री. डवले यांनी मांडली.

जलसंधारण, कृषी विभाग स्वतंत्र करण्याबाबत हालचाली सुरू
जलसंधारण आणि कृषी विभाग स्वतंत्र होणार होते. त्या संदर्भाने शासनस्तरावर हालचाली सुरु असून जलसंधारणमधील अभियांत्रीकी शाखा पूर्णपणे वेगळी झाली आहे, अशी माहिती एकनाथ डवले यांनी दिली. कृषी विभागातील आकृतीबंधाची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...