agriculture news in marathi eatable leaf deal start, sangli, maharashtra | Agrowon

आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

दोन वर्षांत पानाला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे पान उत्पादक मेटाकुटीला आले. पण, यंदा हंगामाची आशादायक सुरवात झाली आहे. सौद्यांच्या निमित्ताने गावातच व्यापारी येतील व शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे. 
- भाऊसो नागरगोजे, नरवाड, ता. मिरज.

सांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नागिलीच्या पानांचे आगार असलेल्या आरग पंचक्रोशीतील पानमळे अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तोट्याचे गणित सोसून पानमळे जोपासले आहेत. या आगारात दोन दिवसांपूर्वी पानांचे सौदे सुरू झाले. गेल्या दोन वर्षांपेक्षा चालू हंगामात दर चांगले मिळू लागले आहेत. सध्या १२ हजार पानांना १००० ते ४००० रुपये असा दर मिळत असल्याने हा प्रारंभ पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात मिरज पूर्व भागातील पाने प्रसिद्ध आहेत. चव, टिकाऊपणामुळे ही पाने अजूनही भाव खाऊन असतात. पंधरा-वीस वर्षांत पानमळ्यांना घरघर लागली. त्यांची जागा ऊस, द्राक्षे, केळी आणि भाजीपाल्याने घेतली. निसर्गाची आणि व्यापाऱ्यांची मनमानी सोसत पानमळे जोपासायचे म्हणजे जोखीमच होती. आरग पंचक्रोशीत पानमळ्यांचे अस्तित्व संपत आले तरी नरवाड, बेडगमध्ये मात्र अजूनही मोठ्या संख्येने पानमळे आहेत.

यापूर्वी पानांचे डाग आणि डप्पी राज्यभरातील विविध शहरांत पाठवले जायचे. तेथे लिलाव किंवा सौदे होऊन शेतकऱ्यांना बिले पाठवली जायची. गेल्या पाच-सात वर्षांत बेडगमध्येच व्यापाऱ्यांनी पानसौदे सुरू केले. त्यांना चांगला प्रतिसाद आहे. पंढरपूर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सोलापूर आदी शहरांतून व्यापारी येतात व पाने घेऊन जातात. आता आरगमध्येही सौदे सुरू झालेत. बेडगमधील व्यापाऱ्यांनीच आरगेत प्राथमिक शाळेसमोर दररोज संध्याकाळी लिलाव सुरू केला आहे.

प्रत्येक मंगळवार, गुरुवार व रविवारी ते होतील. प्रारंभप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देसाई, मल्लिकार्जुन कंगुणे, बयाजी कोरे, माजी सरपंच एस. आर. पाटील, नितीन खरमाटे, वसंत कोरबू आदी उपस्थित होते. गावातच सौदे सुरू झाल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना पानांचे डाग बाहेर पाठवावे लागणार नाहीत. राज्यभरातील व्यापारी गावातच येणार असल्याने समोरासमोर पानांची किंमत ठरेल. तुलनेने चांगला दर मिळेल. 
 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...