agriculture news in marathi, Economic problem of Khandesh farmers | Agrowon

कमी कर्जवितरणाने खानदेशातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

जळगाव : पीककर्ज वितरणातील गोंधळ व संथगतीमुळे शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप अधिक त्रासदायक आणि आर्थिक समस्या उभा करणारा ठरत आहे. खानदेशात पीोककर्ज वितरण ५० टक्केही झाले नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.

जळगाव : पीककर्ज वितरणातील गोंधळ व संथगतीमुळे शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप अधिक त्रासदायक आणि आर्थिक समस्या उभा करणारा ठरत आहे. खानदेशात पीोककर्ज वितरण ५० टक्केही झाले नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आणि जळगाव जिल्हा बॅंकेने पीककर्ज वितरणासंबंधी सुरवातीला बऱ्यापैकी गती दाखविली. परंतु नंतर कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्ज देताना ही गती मंदावली. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मिळून सुमारे १७०० कोटी रुपये कर्ज खरिपासंबंधी वितरित करायचे होते. यातील ९०० कोटी कर्जही वितरित झालेले नाही.

राष्ट्रीयीकृत बॅंकांनी खानदेशात ३० टक्केही कर्ज वितरित केलेले नाही. केवळ धुळे जिल्हा बॅंकेने सोसायट्यांसोबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या मदतीने कर्ज मेळावे घेतले. आता सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे. खरीप हंगामासंबंधी फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. कर्ज प्रस्ताव फेटाळण्याचे प्रकार धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत सुरू आहेत. शेतकरी एका बॅंकेकडून दुसऱ्या बॅंकेत जात आहेत; परंतु त्यांची दखल कुणी घेत नाही.

जळगाव जिल्ह्यात अग्रणी बॅंकेने पीककर्जाबाबत कोणतीही धडक मोहीम राबविली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना तंबी दिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही पीककर्ज मोहीम राबविलीच नाही. यातच काही राष्ट्रीयीकृत बॅंकांचे अधिकारी जून व जुलै महिन्यांत जाणीवपूर्वक सुट्ट्यांवर निघून गेले. कारण पीककर्जाच्या प्रस्तावांची संख्या वाढत
होती. ते मार्गी लावण्याच्या वेळेत नेमकी ही मंडळी गैरहजर होती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...