agriculture news in marathi, Economic problem of Khandesh farmers | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेत आठ दिवसांत एकही फाइल मार्गी लागत नाही !
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

जळगाव : जिल्हा परिषदेत फायली अडकविण्याचे प्रकार सुरू असून, आठ दिवसांत एकही फाइल मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. फायलींची नोंद व ती मार्गी लावण्याची कार्यवाही यातील दिवसांचे अंतर वाढत असून कामे रखडणे, बिले न मिळणे आदी प्रकार सुरू आहेत.  

निविदांच्या फायलींवर काम गतीने होते; परंतु कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, निवृत्त कर्मचाऱ्यांचे रखडलेल्या निधीचे मुद्दे, योजनांसंबंधी मंजुऱ्या, कंत्राटदाराचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव यासंबंधीच्या फायली अडकून राहत आहेत.

जळगाव : जिल्हा परिषदेत फायली अडकविण्याचे प्रकार सुरू असून, आठ दिवसांत एकही फाइल मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. फायलींची नोंद व ती मार्गी लावण्याची कार्यवाही यातील दिवसांचे अंतर वाढत असून कामे रखडणे, बिले न मिळणे आदी प्रकार सुरू आहेत.  

निविदांच्या फायलींवर काम गतीने होते; परंतु कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, निवृत्त कर्मचाऱ्यांचे रखडलेल्या निधीचे मुद्दे, योजनांसंबंधी मंजुऱ्या, कंत्राटदाराचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव यासंबंधीच्या फायली अडकून राहत आहेत.

यावरून मध्यंतरी पदाधिकाऱ्यांनीच वित्त विभागातील फायली अडकविण्यासह कामे दिरंगाईने करण्याच्या विषयावरून नाराजी व्यक्त केली होती. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले आरोग्य विभाग रखडवितो, असे भर सभेत पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. कंत्राटदारांची बिले व इतर जवळपास २०० फायलींवर अंतिम कार्यवाही झालेली नाही. वित्त विभागात फायली साचतात, असे जिल्हा परिषदेतील सदस्यांचे म्हणणे आहे.

वैद्यकीय उपचारानंतर कर्मचाऱ्यांना बिले देय असतात. ती त्यांना वेळेत मिळणे अपेक्षित असते; परंतु दोन ते तीन महिने ही फाइल इकडून तिकडे फिरते. अडकविली जाते. मध्यंतरी फाइल ट्रॅकिंग यंत्रणा जिल्हा परिषद राबविणार होती. फायलींवर आठ दिवसांत निर्णय व्हायला हवा. काही त्रुटी असल्यास संबंधितास तातडीने कळवायला हवे. परंतु काही विभागांत त्रुटी एकामागून एक काढल्या जातात. त्यात दोन महिने वेळ वाया जातो. ठोस कारण सांगितले जात नाही. त्यातच लघुसिंचन, बांधकाम विभागात प्रमुख टेबलावरचे कर्मचारी गायब असतात. ते रजेवर असल्याचे सांगितले जाते. यामुळेही फायलींना विलंब होतो, असे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...