agriculture news in Marathi, Economic survey says Indian economy will grow fast, Maharashtra | Agrowon

भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार
वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नवी दिल्ली : भारताने मागील दोन वर्षांपासून आर्थिक विकासात जलद गतीने झेप घेतली आहे. यंदाही भारताचा विकास दर ७ ते ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील; मात्र त्याच वेळी सरकारसमोर वाढणाऱ्या तेल किमती आणि स्टॉक किमतीत होणारे जलद बदल यांचे मोठे आवाहन असणार आहे, असे सोमवारी (ता. २९) केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. 

नवी दिल्ली : भारताने मागील दोन वर्षांपासून आर्थिक विकासात जलद गतीने झेप घेतली आहे. यंदाही भारताचा विकास दर ७ ते ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील; मात्र त्याच वेळी सरकारसमोर वाढणाऱ्या तेल किमती आणि स्टॉक किमतीत होणारे जलद बदल यांचे मोठे आवाहन असणार आहे, असे सोमवारी (ता. २९) केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. 

अर्थसंकल्प सादर करण्याच्या दोन दिवस आधी सोमवारी (ता. २९) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. आर्थिक पाहणी अहवालात चालू वर्षातील विकास दर ६.७५ टक्के राहिला; परंतु पुढील आर्थिक वर्षात निर्यात आणि खासगी गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि विकास दर वाढेल. २०१४-१५ मध्ये विकास दर ७.५ होता तो २०१६-१७ मध्ये ७.१ टक्के राहिला. जीएसटी आणि नोटाबंदी या दोन्ही निर्णयामुळे कर संकलनात १८ लाख करदात्यांची भर पडली आहे, असा दावा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केला आहे.

यंदा सादर कलेलेल्या आर्थिक पाहणी अहवालाचा रंग गुलाबी होता. देशात अजूनही जन्मावेळी मुलालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे स्त्री-पुरुष गुणोत्तरात घट होऊन सध्या देशात ६३ दशलक्ष मुलांची संख्या कमी आहे. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालाचा रंग गुलाबी ठेवून महिलांवरील अत्याचाराविरोधी सुरू असलेल्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. देशात २००५-०६ मध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण ३६ टक्के होते. त्यात घट होऊन २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २४ टक्क्यांवर आले आहे. 

देशात सरकारने लागू कलेलेल्या जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करदात्यांमध्ये वाढ झाली आहे. जीएसटी लागू केल्यानंतर ३४ लाख व्यवसाय कराच्या अखत्यारीत आली असून, अप्रत्यक्ष करदात्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जीएसटी लागू केल्यानंतर जुलै महिन्यात ९५ हजार कोटी रुपये जीएसटी वसूल झाली होती. आॅगस्ट महिन्यात ९१ हजार कोटी, सप्टेंबर महिन्यात ९२ हजार १५० कोटी, आॅक्टोबरमध्ये ८३ हजार कोटी, नोव्हेंबरमध्ये ८० हजार ८०८ कोटी आणि डिसेंबर महिन्यात ८६ हजार ७०३ कोटी रुपये जीएसटी वसुल झाली आहे, अशी माहिती आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे. 

आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे

 • २०१८-१९ मध्ये विकास दर ७ ते ७.५ टक्के राहणार
 • २०१७-१८ मधील विकास दर ६.७५ टक्के राहिला.
 • भारत जलद विकास करणारी अर्थव्यवस्था ठरणार
 • तेल किंमत वाढल्यास आणि स्टॉक्सच्या किमतीत जलद बदल झाल्यास धोरणात्मक दक्षता आवश्यक
 • शेतीला पाठबळ, एअर इंडियाचे खासगीकरण आणि बॅंकांचे पुनर्भांडवलीकरण हा पुढील वर्षाचा अजेंडा
 • जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करदात्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ
 • इतर संघराज्यीय देशांच्या तुलनेत भारतातील राज्यांचे कर संकलन कमी
 • नोटाबंदीने देशात आर्थिक बचतीला चालना मिळाली
 • २०१७-१८ मध्ये किरकोळ चलवाढ ३.३ टक्के, मागील ६ वर्षांतील निचांकी पातळीवर
 • भारतातील अपिल आणि न्यायालयातील खटल्यांना विलंब, प्रलंबित खटले आणि अनुशेष कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक
 • शहराकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे शेतीचे महिलाकरण होत आहे
 • शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेसाठी २० हजार ३३९ कोटी रुपयांना मंजुरी
 • २०१७-१८ मध्ये एफडीआयमध्ये १५ टक्क्यांनी वाढ
 • स्वच्छ भारत अभियानामुळे जानेवारी २०१८ मध्ये ७६ टक्के क्षेत्राचा मोहिमेत समावेश

इतर अॅग्रोमनी
कांद्यातील नरमाई किती काळ?कां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...
चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...
सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन...नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या...
मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढया सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ...
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....