agriculture news in marathi, economicaly uncapable APMCs will be under administrater | Agrowon

'असक्षम' बाजार समित्यांवर भाजपकडून कार्यकर्त्यांची वर्णी?
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे : सार्वत्रिक निवडणुकांचा खर्च करण्यास सक्षम नसल्याचे पत्र निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या ५१ पैकी १२ बाजार समित्यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले आहे. यामुळे आर्थिक सक्षम नसलेल्या बाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला अाहे. 

पुणे : सार्वत्रिक निवडणुकांचा खर्च करण्यास सक्षम नसल्याचे पत्र निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या ५१ पैकी १२ बाजार समित्यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले आहे. यामुळे आर्थिक सक्षम नसलेल्या बाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला अाहे. 

ग्रामीण महाराष्ट्रातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विविध प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणजे माेदी लाटेचा फायदा घेण्यासाठी या निवडणुकांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांला मतदानाचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल करीत निवडणूक प्रक्रियेतदेखील बदल केला. त्यानुसार निवडणुका असलेल्या ५१ बाजार समित्यंची निवडणूक प्रक्रियादेखील सुरू केली. मात्र नवीन पद्धतीमध्ये निवडणुकीचा खर्च संबधित बाजार समितीने करावयाचा अाहे. यामुळे ५१ पैकी १२ बाजार समित्यांनी पैसे नसल्याचे पत्रच प्राधिकरणाला दिल्याने प्रश्‍न उपस्थित झाला आहे.  

या निवडणुका घेण्याची जबाबदारी प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. सध्या पुण्यासह सोलापूर आणि नाशिक या बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील बाजार समितीच्या मतदारांची प्राथमिक यादी तयार झाली आहे.

असक्षम १२ बाजार समित्या
करमाळा (जि. सोलापूर), परांडा (जि. उस्मानाबाद), मातोळा, सिंधखेडराजा (जि. बुलडाणा), दारव्हा, बोरी अरब (जि. यवतमाळ), काटोल, हिंगणा, कळमेश्वर, नरखेड, कामठी (जि. नागपूर), गोंदिया.

मिनी विधानसभा...
बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या नव्या नियमावलीनुसार कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन धारण असलेला शेतकरी मतदार असणार आहेत. यामुळे ही निवडणूक मिनी विधानसभा म्हणून आेळखली जाणार आहे. या निवडणुकीसाठी किमान दीड काेटींचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च संबंधित बाजार समितीने करावा, असे कायद्यात स्पष्ट आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...