agriculture news in Marathi, effect on cotton production due to bowllworm, Maharashtra | Agrowon

कपाशीचे पीक बोंडअळीच्या घशात
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

दोन पिशव्या कापूस बियाणे सव्वा एकर शेतात पेरले. आजपर्यंत एका वेचणीतून अडीच क्विंटल कापूस निघाला. बारा ते तेरा क्विंटल कापसाच्या उत्पन्नातून चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित होते. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले आहे. मी काही कापूस मोडून काढून टाकला आहे.
-किसन सिरसाठ, शेतकरी, कोळवाडी

किनगाव ः कापूस राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून नैसर्गिक आपत्तीने जिल्हाभरातील उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आले आहेत.

प्रतिकूल हवामानामुळे यंदा कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे. बी. टी. संकरित वाणाच्या सर्व कंपनीच्या पिकावर सध्या ठिपक्‍याच्या बोंडअळीने थैमान घातले आसून कापूस लागवड शेतकरी चिंतेत आहेत. किनगावसह सोणवणेवाडी, हंगेवाडी, चाटेवाडी, सिरसाठवाडी, कोळवाडी, दगडवाडी या गावांतील जवळपास शंभरावर शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली.

खत व फवारणी खर्च करून, विद्युत पुरवठ्याच्या अनंत अडचणीला सामोरे जाऊन पाणी देऊन कापसाचे पीक जगवले. या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे पंचाहत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या सहकार्याने बोंडअळी प्रभावित शेतीचे पंचनामे करणे चालू झाले आहेत. दरम्यान, जिल्हाभरात कापसाची हीच स्थिती आहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस टोळी देण्‍याच्‍या आमिषाने फसवणूकसांगली - ऊस तोड टोळी पुरवण्याच्या आमिषाने शेतकरी...
ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची...मुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी...
भंडारा जिल्हा परिषदेचा गड काँग्रेस-...भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश...
रविकांत तुपकरांची लाेकसभेसाठी माढामधून...अकाेला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलख मैदानी...
कायदा हातात घेण्याची वेळ आणू नकाउस्मानाबाद : आम्ही कायदा हातात घेत नाही, तशी...
साताऱ्यात हरभऱ्याची साडेसत्तावीस हजार...सातारा: हरभऱ्याचा फायदेशीर ठरणारा बिवड तसेच...
साताऱ्यात काळा घेवडा २५० ते ३५० रुपये...सातारा  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगाव येथे तुरीला मिळतोय हमीभावापेक्षा...जळगाव ः तुरीचे उत्पादन यायला सुरवात झाली, तरीही...
परभणी, हिंगोलीत सात लाख क्विंटल कापूस...परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या...
पाणीटंचाईमुळे आटपाडीतील रब्बी पिके धोक्...सांगली : आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाईमुळे रब्बी...
कृषी सल्ला : रब्बी भुईमूग, मोहरी, आंबा...भुईमूग ः  रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी...
माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवासोलापूर : "शेतकऱ्यांची ज्ञान, तंत्रज्ञान...
विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स....पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
अपरिक्व नवीन आडसाली उसाला तुराकोल्हापूर : यंदा नुकत्याच लागवड केलेल्या आडसाली...
जतमधील शेतीपंपांना अवघा चार तासच...सांगली  ः जत तालुक्‍यात परतीचा पाऊस...
सातारा जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळपसातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
चार जिल्ह्यांत तलाव ठेक्‍यातून अडीच...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन...कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत...
पुणे विभागात गव्हाची एक लाख ६६ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाची पेरणी उरकली...